ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

पतीचं निधन, मग शेजाऱ्यासोबतच जुळलं, माजी सरपंच महिलेसोबत…, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात शॉकिंग खुलासा…

10 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूर: पंढरीला जायचं सांगून गाडीत घेतलं आणि शेतातील म्हशीच्या गोठ्यात नेऊन माजी सरपंच महिलेचा कायमचा काटा काढला. लग्नासाठी सतत धमकावल्याने प्रियकरानेच सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) हिची हत्या केली. भिवंडीत पोलिसांनी गाडी अडवली असता हा धक्कादायक प्रकार पुढे आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील (वय 40, रा. शिरगाव) याला ताब्यात घेतले असून तपासातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा न्यारे या शिरगावच्या माजी सरपंच होत्या. तर प्रकाश उर्फ बाबू पाटील हा त्यांच्या शेजारीच राहतो. दोन्ही कुटुंबात शेतातील कामांसाठी पैरा होता. त्यामुळे त्यांच्यात जवळीक होती. दरम्यानच्या काळात दीड वर्षांपूर्वी सुरेखा हिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिचे आणि प्रकाश यांच्यात प्रेमसंबंध जुळले. पुढे सुरेखा वारंवार लग्नासाठी तगादा लावायला लागली. त्यातूनच चिडलेल्या प्रकाश याने सुरेखाचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

Kolhapur: पंढरीला जायचं सांगितलं, माजी सरपंच महिलेला म्हशीच्या गोठ्यातच…, प्रियकराच्या भयंकर कृत्यानं कोल्हापूर हादरलं

पंढरीला जाऊ सांगितलं अन् शेतात नेलं

सुरेखा हिला पंढरपूरला जाऊ असे सांगत प्रकाश याने आपल्या गाडीत घेतलं. त्यानंतर पंढरीकडे न जाता थेट गावाबाहेरील लिंडोरी येथील शेतात नेलं. तिथे त्याचा म्हशींचा गोठा आहे. त्याच गोठ्यात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रकाशने सुरेखाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर याबाबत कुणालाही थांगपत्ता लागू नये म्हणून मृतदेह मुंबईच्या समुद्रात टाकण्याचा निर्णय घेतला.

भाच्यामुळे कट फसला

प्रकाश याने सुरेखाचा मृतदेह पोत्यात बांधून स्वतःच्या गाडीच्या डिकीत ठेवला. त्यानंतर गाडी घेऊन रात्रभर प्रवास करत थेट भिवंडीत पोहोचला. तिकडे गेल्यानंतर त्याने कळशे येथील आपल्या भाच्याला फोन केला. घडलेली हकीकत सांगितली आणि पुढील कटाची माहिती दिली. मृतदेह समुद्रात फेकण्यासाठी मदत कर म्हणून भाच्याला सांगितले. मात्र, मामाने खून केल्याचे ऐकताच भाचा भेदरला आणि थेट जवळच्या नारपोली पोलिसांना माहिती दिली.

या हत्या प्रकरणाबाबत माहिती मिळताच पोलिसांनी गाडी अडवली. तसेच डिकीत पाहिले असता मृतदेह आढळला. त्यांनी लगेच प्रकाश, गाडी आणि मृतदेह ताब्यात घेतला. अधिक चौकशी केली असता लग्नासाठी धमकावत असल्याने खून केल्याची कबुली प्रकाशने दिली.

दरम्यान, खुनाच्या घटनेनं शिरगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद नारपोली पोलिसांतून शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर