ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

विकसित महाराष्ट्र 2047 : युवांच्या दमदार उपस्थितीत क्रीडा व युवक संवाद

35 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

यवतमाळ जिल्ह्याचे झळाळते प्रतिनिधित्व – महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार्थी स्वाती किशोर ठेंगणे यांची उल्लेखनीय भूमिका

सुरेश पाचभाई मारेगाव

यवतमाळ, ता. २२ सप्टेंबर “विकसित महाराष्ट्र 2047” या भविष्योन्मुख संकल्पनेअंतर्गत विभागीय मंत्री (क्रीडा व युवक कल्याण) मा. ऍड. श्री. माणिकरावजी कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या युवा व क्रीडा संवाद कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याने दमदार उपस्थिती नोंदवली.

या संवादात जिल्ह्याचे सक्रिय युवा प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा युवा पुरस्कार्थी कु. स्वाती किशोर ठेंगणे (कीर्तनकार, श्रीमद्भागवत व शिवमहापुराण कथा प्रवक्ता) यांनी युवकांसाठी दिशा दाखवणारे विचार मांडले. सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात युवकांची भूमिका अधोरेखित करताना ठेंगणे यांनी युवकांना क्रीडा, संस्कार आणि सेवाभाव यांचा संगम व राज्य तथा देशाच्या क्रीडा क्षेत्रात विकास साधण्याचे आवाहन केले.

मा. मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात “महाराष्ट्रातील 2047 पर्यंतच्या विकसित महाराष्ट्राच्या उभारणीची खरी ताकद यामध्ये क्रीडाक्षेत्र देखील महत्वपूर्ण  आहे” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. या संवादास जिल्ह्यातील अनेक युवक प्रतिनिधी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि क्रीडा क्षेत्रातील कार्यरत कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात ठेंगणे यांचा गौरव करण्यात आला असून त्यांच्या कार्याचे राज्यस्तरावर कौतुक व्यक्त करण्यात आले. युवकांनी नवउमेद व सकारात्मक उर्जेने महाराष्ट्र घडवावा, असा संदेश या संवादातून अधोरेखित झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर