ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

Sachin Tendulkar : ‘सूनबाई चहा हवा का कॉफी?’, जगाने पहिल्यांदाच पाहिला आपल्या सचिनमधला प्रेमळ सासरा, Video

7 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई : जगातला सगळ्यात महान क्रिकेटर असलेला सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानातल्या त्याच्या विक्रमासाठी ओळखला जातो, पण त्याहीपेक्षा त्याचं जंटलमनसारखं वागणं अजूनही जगातल्या कोट्यवधी चाहत्यांना तितकंच भावतं. मुलगा, पती, आणि वडिलांची भूमिका निभावल्यानंतर सचिन याचवर्षी सासराही झाला आहे. सचिनचा मुलगा अर्जुन याचं सानिया चंडोकसोबत 5 मार्च 2026 ला लग्न झालं.

अर्जुनच्या लग्नानंतर सचिनमधला प्रेमळ सासरा जगाने पहिल्यांदाच पाहिला. एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि सून सानियासोबत गेला होता. या कार्यक्रमात बसलेला असताना तेंडुलकर कुटुंबाला चहा आणि कॉफी दिली जात होती, तेव्हा सचिनने सून सानिया चंडोकला तुला चहा हवा का कॉफी? असा प्रश्न आपुलकीने विचारला, यानंतर सानियाने ब्लॅक कॉफी सांगितल्यानंतर सचिनने तिथल्या कर्मचाऱ्याला ब्लॅक कॉफी आणून द्याल का? अशी विनंती केली. सचिन तेंडुलकरच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी इमोशनल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कोण आहे सानिया चंडोक?
मुंबईच्या वरळी भागातल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याला भारतीय क्रिकेटपटूंसह अनेक सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती. सानिया चंडोक ही देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब फाईव्ह स्टार इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी सारख्या व्यवसायात सक्रिय आहे. घई कुटुंबिय आरोग्यासाठी अनुकूल आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट ब्रँडमध्ये मोठं नाव आहे. ग्रॅव्हिस गुड फूड्स देखील घई कुटुंबाचाचा ब्रँड आहे.

एका प्रसिद्ध कुटुंबातून असूनही, सानियाने स्वतःचा वेगळा मार्ग निवडला. सानिया सध्या मुंबईमध्ये एक प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअर मिस्ट पॉ याची संस्थापक आहे. सानिया चंडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर