ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

बँकेतील नोकरी, हसतं-खेळतं आयुष्य, मोहोळच्या कीर्तीनं राहत्या घरी का संपवली जीवनयात्रा?

11 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर : भविष्याची अनेक स्वप्ने उराशी बाळगून रोज नवनवीन आव्हानांना सामोरे जाणारे एक हसते-खेळते आयुष्य एवढ्या टोकाच्या वळणावर येऊन संपेल, असा विचारही कोणी केला नव्हता. अज्ञात कारणावरून मोहोळ शहरातील एका 24 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (29 जुलै) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. कीर्ती किसन शेजाळ (वय 24) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मयत कीर्ती ही एका खासगी बँकेत नोकरीस होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरातील अण्णा भाऊ साठे नगर परिसरात किसन शेजाळ हे आपल्या कुटुंबासह राहतात. 29 जुलै रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास कीर्तीच्या खोलीचा दरवाजा तिच्या आई-वडिलांनी वाजवला, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिचे बंधू बिरुदेव शेजाळ तेथे आले. संशय आल्याने कुटुंबीयांनी खिडकीची काच फोडून आत पाहिले असता, कीर्तीने साडीच्या साहाय्याने खोलीतील लोखंडी पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

​कुटुंबीयांनी तातडीने खोलीचा दरवाजा तोडून तिला खाली उतरवले आणि उपचारासाठी मोहोळ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

​या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, याप्रकरणी बिरुदेव महादेव शेजाळ यांनी खबर दिली आहे. या आत्महत्येचे मूळ कारण अद्याप समजू शकलेले नसून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ करत आहेत. तिच्या या अचानक निघून जाण्याने शेजाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण मोहोळ शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर