ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

सोलापूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, एका एकरात केली गुलछडीच्या फुलांची लागवड, वर्षाला लाखात कमाई

7 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


​सोलापूर : पारंपरिक शेतीला फाटा देत योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण पीक पद्धतीचा अवलंब केल्यास शेतीतून घवघवीत यश मिळवता येतं. हे सोलापूरच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवलं आहे. मोहोळ तालुक्यातील शेतकरी बाळासाहेब भोसले यांनी केवळ एका एकरात गुलछडीच्या फुलांची लागवड करून गेल्या तीन वर्षांत तब्बल 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

तीन वर्षांचे नियोजन अन् हमखास उत्पन्न

मोहोळ तालुक्यातील ​बाळासाहेब भोसले हे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून गुलछडीची शेती करत आहेत. गुलछडी पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर पुढील तीन वर्षांपर्यंत यातून सतत उत्पन्न मिळत राहते. लागवडीनंतर साधारण पाच महिन्यांनी झाडांना फुले येण्यास सुरुवात होते. भोसले रोज सकाळी फुलांची तोडणी करून ती मुंबईतील दादर मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवतात.

दादर मार्केटमध्ये फुलांना मोठी मागणी

​मुंबईच्या बाजारपेठेत या फुलांना चांगला उठाव मिळत असून त्यांना 50 रुपयांपासून ते 300 रुपये प्रति किलोपर्यंतचा दर मिळतो. बाजारातील या चांगल्या भावामुळे बाळासाहेब यांना एकट्या या वर्षात सुमारे 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर तीन वर्षांच्या संपूर्ण कालावधीत त्यांनी गुलछडीच्या माध्यमातून 8 लाखांची कमाई केली आहे.

​योग्य बाजारपेठेचा अभ्यास आणि वेळेवर केलेले नियोजन यामुळेच शेतीतून असा मोठा नफा मिळवणे शक्य झाल्याचे भोसले सांगतात. त्यांच्या या यशामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही फूलशेती सारख्या नगदी पिकांकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर