ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव येथे जुनी पेंशन योजना लागू करा या मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांचा संप.

67 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तहसिल कार्यालय चौक येथून निघाली भव्य बाईक रॅली.

शासकीय व निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर.

सुरेश पाचभाई मारेगाव :-येथे आज दिनांक 14 मार्च 2023 रोज मंगळवारला राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या साठी मारेगाव येथे जुनी पेंशनच्या संदर्भात 1 नोव्हेम्बर 2005 पूर्वीचे व नंतरचे सर्वच शासकीय व निमशासकीय विभागातील कर्मचारी संपात सहभागी झालेले होते.

उपविभागीय अधिकारी यांना न्याय्य मागण्याचे निवेदन कार्यालय प्रमुखांना सरवच संघटनांनी यापूर्वीच देण्यात आले आहे.तहसील कार्यालय येथे सकाळी 11 वाजता संपाला सुरुवात करण्यात आली.असुन बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.परिणामी या मुळे सर्वच सरकारी कार्यालयात या संपामुळे शुकशुकाट दिसून आली.

आज दिनांक 14 मार्च पासून बेमुदत संपात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले असून मारेगांव येथील तहसील कार्यालय चौक येथुन रैलीला सुरवात झाली व शहरातील आंबेडकर चौक,बाळासाहेब ठाकरे चौक,नगर पंचायत,मार्डी चौक,कला वाणिज्य मार्गे तहसील पर्यंत भव्य बाईक रैली काडण्यात आली त्या नंतर दिवसभर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली असुन तहसील कार्यालय येथील प्रांगणात सभेत रूपांतर झाले.

समयोचित सर्व पदाधिकारी यांची भाषणे झालीत.सभेचे अध्यक्ष दरबेश्वर सर होते यावेळी जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष नितीन बेहरे,मध्यवर्ती कर्मचारी युनियन चे अध्यक्ष,महसूल कर्मचारी संघटना शाखा मारेगांव चे अध्यक्ष राजगडकर साहेब, IBTA संघटनेचे अध्यक्ष सुके सर,तालुका अध्यक्ष सातपुते सर, म. रा. शिक्षक समिती मारेगाव चे अध्यक्ष पिंपळकर सर, शिक्षक सह.संघटन जिल्हाध्यक्ष शशिकांत चाफेकर, विजय घोडमारे,

आरोग्य कर्मचारी संघटनेचे बळीराम आत्राम,ग्रामसेवक संघटनेचे टी.आर.कडू नगरपंचायतचे कर्मचारी अनिल कांबळे ,म. रा.कृषी सहाय्यक संघटनेचे पवार साहेब,विमाशी चे धनराज ठेपाले, जिवतोडे सर, नरवाडे सर, विद्याताई मत्ते पंचायत समिती,सोनू महाकुलकर वनविभाग कर्मचारी,बाळासाहेब देशमुख आर्टस् कॉमर्स सायन्स कॉलेज आदी उपस्थित होते.

या संपत मारेगाव येथील शिक्षक शिकसेत्तर आरोग्य विभाग ,महसूल विभाग.पंचायत समिती नगर पंचायत जिल्हा परिषद, कर्मचारी उपस्थित होते.जुनी पेन्शन संदर्भातील संपात मारेगाव तालुक्यातील सर्वच विभागातील सुमारे 200 ते 300 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर