ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

साहेब रेती द्या हो, रेती! घरकुलधारक लाभार्थ्यांचा टाहो

966 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रेतीअभावी रखडले घरकुलधारक लाभार्थ्यांचे काम

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव: तालुक्यातील घरकुलधारक लाभार्थ्यांना मोफत रेती मिळवून देणारा शासन आदेश निघाला. मात्र सध्यातरी तो हवेत विरला.रेतीच  नसल्यामुळे घरकुलाचे बांधकाम रखडले.त्यामुळे घरकुलधारक लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.एकीकडे तालुक्यात केंद्र शासनाने गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकूल योजना राबवली.

प्रधानमंत्री व इतर घरकुल आवास योजनेअंतर्गत २०२४ ते २०२५ या वर्षामध्ये गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले. त्यामध्ये तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे ३,१७६ घरे मंजुर झालीत. तर मोदी आवास योजनेची १,६७७, शबरी आवास योजनेची ८९८, आदिम आवास योजनेची ५२०, रमाई आवास योजनेची ३८६, पी.एम जनमन आवास योजनेची ८९१ घरकुले मंजुर करण्यात आली आहेत.

मंजुर घरकुलांसाठी शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्यांला ५ ब्रास रेतीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना अद्यापही रेती मिळाली नसल्याने घरकुलांचे काम अर्धवट पडले आहे.घरकुलाचे बांधकाम आपल्याला पूर्ण करायचे असल्याने लाभार्थी आपले राहायचे कसेबसे मोडकळीस आलेले घर पाडत आहेत. आपले संसार ताडपत्रीच्या साह्याने उघड्यावर मांडले आहेत. रेतीअभावी त्यांचे घरकुलाचे काम रखडलेले आहे.

घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी

मारेगाव तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. पण येथील गरजवंतांना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुलाची कामे मंजूर करण्यात आली आहेत.परंतु शासनाकडून मिळत असलेली ५ ब्रास रेती लाभार्थ्यांना मिळत नाही. घरकुलाची कामे रखडली आहेत. त्यामुळे गवंडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून होत आहे.

चोरीच्या रेतीला अधिकचे पैसे मोजावे लागतात

प्रशासनाने घरकुलधारक लाभार्थ्यांची गंभीर बाब लक्षात घेऊन तत्काळ रेती उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सध्या रेतीचा तुटवडा असल्याने चोरीच्या रेतीला अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. एकूणच रेती खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नागरिकांची मोठी लूट होत असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर