ब्रेकिंग न्यूज
Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार
SP News Maregaon

दिग्वेश राठीने वर्षभरानंतर घेतला नितीश राणाचा बदला! ऋषभ पंतने मिटवला होता क्रिकेटमधला सर्वात खुंखार वाद, पण…

11 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Nitish Rana out In DPL WDL vs PD : गेल्या वर्षी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये वेस्ट दिल्ली लायन्स आणि साऊथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यातील एलिमिनेटर मॅचदरम्यान मोठा राडा झाला होता. त्यावेळी नितीश राणाने दिग्वेश राठीला सिक्स मारत इंगा दाखवला होता. त्यानंतर आता दिग्वेश राठीने नितीश राणाची विकेट काढून वर्षभरानंतर बदला घेतला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मागील आयपीएलमध्ये ऋषभ पंतने पुढाकार घेऊन वाद मिटवला होता, आता याचा नवा अध्याय सुरू झालाय का? असा सवाल विचारला जात आहे.
सिक्सचा बदला दुसऱ्याच बॉलवर घेतला 
दिल्ली प्रीमियर लीग 2026 मधील 6 वा सामना वेस्ट दिल्ली लायन्स आणि पुरानी दिल्ली 6 यांच्यात खेळला गेला. या मॅचमध्ये पुरानी दिल्ली 6 च्या टीमने 7 विकेट्सने विजय मिळवला. या मॅचमध्ये राडा पहायला मिळाला. मागच्या वर्षीच्या सिक्सचा बदला दिग्वेश राठीने या वर्षी फक्त दुसऱ्या बॉलवर घेतला. नितीश राणा 4 बॉलमध्ये 3 धावांवर खेळत असताना त्याने स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दिग्वेश राठीने त्याला एलबी़डब्ल्यू केलं अन् वर्षभरापूर्वीचा बदला घेतला.

View this post on Instagram

A post shared by Delhi Premier League T20 (@delhipremierleaguet20)

मागच्या वर्षी काय घडलं होतं?
मागच्या वर्षी झालं असं होतं की, दिग्वेश राठीने बॉलिंगच्या रन-अपदरम्यान अचानक थांबत बॉल टाकणं टाळलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुढच्याच बॉलला दिग्वेश रन-अपवर असताना नितीश राणाने बॅटिंगच्या स्टान्समधून बाहेर पडत खेळण्यास नकार दिला. या प्रकारानंतर मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये तणाव वाढला आणि बाचाबाची सुरू झाली. यानंतर नितीश राणाने दिग्वेश राठीच्या बॉलवर रिव्हर्स स्विप मारत एक शानदार सिक्स मारला. सिक्स मारल्यानंतर राणाने दिग्वेशच्या प्रसिद्ध ‘नोटबुक सेलिब्रेशन’ची बॅटने नक्कल करत त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. या सेलिब्रेशननंतर दिग्वेश प्रचंड संतापला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली, जी पाहता इतर खेळाडूंना आणि अंपायर्सना मध्यस्थी करावी लागली होती.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर