ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

अखेर बेपत्ता महिलेचा मृतदेहच आढळला

208 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सदर महिलेला होते 14 दिवसाचे बाळ

सुरेश पाचभाई मारेगाव

रात्री अडीच वाजताच्या दरम्यान घरून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह अखेर गावातीलच विहिरीमध्ये आज सायंकाळी 6 वाजता आढळून आला.मनाला हेलकावून टाकणारी ही घटना तालुक्यातील बोटोनी येथे घडली.शुभांगी विपुल लालसरे वय अंदाजे 24 वर्षे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

तालुक्यातील बोटोनी येथील शुभांगी हिचे एक वर्षांपूर्वी विपुल लालसरे यांचेसोबत लग्न झाले होते.त्यांना नुकतेच 14 दिवसापूर्वी बाळ जन्माला आले होते. बाळ, बाळाची आई दोघेही सुखरूप होते.अशातच दि.6 मे च्या मध्यरात्री अडीच वाजताच्या दरम्यान शुभांगी ही कोणालाही न सांगता घरून निघून गेली.

शुभांगी घरी आढळून न आल्याने घरच्यांनी तिचा सर्वत्र शोधाशोध केली.तसेच गावातील मित्रमंडळीच्या मदतीने गाव तसेच जवळपास सगळीकडे शोधले असता शुभांगी कोठेही आढळून आली नाही.शेवटी गावातच असलेल्या विहिरीजवळ शुभांगीच्या चपला आढळून आल्या. या संशयावरुण काहींनी विहिरीत गळसोडुन बघीतले असता शुभांगीचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

========================
चिमुकल्याचा मातेसाठी टाहो ========================
अवघ्या 14 दिवसाचे असलेले शुभांगीचे बाळ मातेसाठी टाहो फोडतांना दिसले.आईच्या दुधासाठी चिमुकल्याचा जीव कासावीस झालेला होता.शुभांगीच्या मृत्यूने गावात शोककळा पसरलेली आहे. शुभांगीच्या पश्चात पती, सासु,सासरे,14 दिवसाचे बाळ असा आप्तपरिवार आहे.शुभांगीच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीटजमदार किसन शंकुरवार करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर