ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पेरले पण उगवलेच नाही हो..सोयाबीन बियाणे.

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

हवालदिल शेतकऱ्यांची कृषी विभागात तक्रार.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील एकूण क्षेत्राफळापैकी ४४ हजार हेक्टर जमीन कृषी क्षेत्रात येत असुन सहा  हजार क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होणार आहेत.शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करीत असतांना पेरणीला सुरवात केली यात सोयाबीन पेरले असता उगवले नसल्याने शेतकऱ्यात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. एका नामांकित कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून पेरणी केली असता उगवले नसल्याने कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली असून  सदर  शेतातील पंचनामा करण्याकरता विनंती करण्यात आली आहे,

प्रशासनाकडून दखल देण्यात यावी करिता विनवणी करण्यात आली आहे.मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरातील शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरणी केली असता आठ दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी  अंकुरले नाही, परंतु दुसऱ्या नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरली असता अंकुर फुटून झाडांची वाढ होत आहे.

त्यामुळे ही बियाणे पेरणी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले. सोयाबीन बियाणे अंकुरले नसल्याने शेतकऱ्याला आर्थिक संकटाला सामोर जावे लागत आहे. कृषी विभागाने शेतात जाऊन पंचनामा करून तात्काळ निर्णय द्यावा असे तक्रारीत नमूद केले आहे.तक्रारीत मार्डी परिसरातील वडगाव  येथिल शेतकरी विजय खामनकर,रामदास ठावरी, गणेश ठावरी, दिवाकर कोल्हे, गोपाळ ठावरी,संजय फरताडे, अंबादास ठावरी, संजय येरमे, दीपक ठावरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

***प्रतिक्रिया ***
या शेताची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करू.100 मि.मी. पाऊस  होई पर्यंत पेरणी करू नये असे फर्मान कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले होते. बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करून पेरणी करण्यात यावी असे मार्गदर्शन करण्यात आले होते. तरी सदर बाबीचा तपास करण्यात येईल

सुनील निकाळजे
तालुका कृषी अधिकारी मारेगाव

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर