ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

जेवणासाठी आलेल्या मुलींना नको तिथे हात लावायचा, आदिवासी आश्रम शाळेतील 21 विद्यार्थिनींचा विनयभंग

11 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आश्रम शाळेतील विद्यार्थिनी अजूनही सुरक्षित नाहीत. आधी साप चावल्याने आता विद्यार्थिनींचा रोज विनयभंग होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. गडचिरोलीतील आश्रम शाळेतील घटनेचे पडसाद अजूनही उमटत असताना शहापूरमधून एक अत्यंत संतापजनक आणि सुन्न करणारी घटना समोर आली. टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत एकाच वेळी तब्बल २१ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी स्वयंपाकगृहातील मदतनीस गणपत झिपरू गवळी या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

जेवणाचे ताट धुवायला जाणाऱ्या मुलींवर वाईट नजर
आदिवासी विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून आश्रमशाळांमध्ये विविध उपाययोजना केल्या जात असताना शहापूरमधील येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तब्बल २१ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.

टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत एकाच इमारतीत हे वसतीगृह चालवले जाते. दुसऱ्या मजल्यावर मुले आणि तिसऱ्या मजल्यावर मुली राहतात. कपडे धुण्यासाठी आणि जेवणासाठी मुलींना वारंवार खाली यावे लागते. याच गोष्टीचा गैरफायदा आरोपी गणपत गवळी घेत होता.

मुली जेवणाचे ताट धुण्यासाठी आल्या की हा आरोपी त्यांच्या हाताला, पाठीला आणि इतर ठिकाणी विनाकारण स्पर्श करायचा. इतकेच नाही, तर १०वीत शिकणाऱ्या एका पीडित मुलीला त्याने एकटे गाठून तिच्यावर थेट अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थिनींनी हिम्मत करून गाठलं पोलीस स्टेशन
आरोपीच्या वृत्तीला कंटाळून पीडित मुलींनी संपूर्ण हकीकत वसतीगृह अधीक्षकांना सांगितली. यानंतर अधीक्षकांनी मुलींना सोबत घेऊन थेट शहापूर पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५४ आणि अतिशय कडक अशा पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून थेट आधारवाडी मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आलं.

जुना रेकॉर्ड खराब असूनही पुन्हा नोकरीवर कसं ठेवले?
तपासात उघड झालेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या आरोपीने यापूर्वीही आश्रमशाळेतील एका मुलीचा विनयभंग केला होता. त्या गंभीर प्रकारानंतर त्याला निलंबित करण्यात आले होतं, असं असतानाही त्याला पुन्हा त्याच आश्रमशाळेत आणि तेही अल्पवयीन मुलींच्या थेट संपर्कात येणाऱ्या कामावर कोणी आणि का पाठवले? असा संतापजनक सवाल पालक विचारत आहेत.

पालकांचा प्रचंड संताप
आपल्या चिमुकल्या मुली सुरक्षीत वातावरणात शिक्षण घेतील या आशेने त्यांना आश्रमशाळेत पाठवणाऱ्या पालकांमध्ये या घटनेमुळे भीती आणि तीव्र संतापाचे वातावरण आहे. केवळ कागदोपत्री चौकशी किंवा निलंबनाचा बनाव न करता, आरोपीला पाठशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि या संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी आता पालकांकडून केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर