ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

मारेगावात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; शांतता, बंधुभावाचा संदेश

30 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आकर्षक रोषणाई, धार्मिक मिरवणूक व युवकांच्या बाईक रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: शहरात हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र सण भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रेम, बंधुभाव, मानवता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.

उत्सवानिमित्त गौसिया मशिदीवर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. सकाळी मशिदीच्या प्रांगणात इस्लामिक ध्वज फडकवून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. नात शरीफच्या भक्तिमय सुरांनी परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

मिरवणुकीत मक्का-मदीना आणि काबा शरीफच्या आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. गौसिया मशीद कमिटीच्या युवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने बाईक रॅली काढून उत्सवात सहभाग नोंदविला. मिरवणूक मार्गावर नागरिकांनी सरबत, मिठाई व अल्पोपहाराचे वाटप करून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले.

ही मिरवणूक चांदशहा दर्गा, नगरपंचायत व माडी रोड मार्गे पुन्हा गौसिया मशिदीजवळ पोहोचली. उत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी मारेगाव पोलिसांनी आवश्यक बंदोबस्त ठेवला होता.
यानंतर झालेल्या धार्मिक सभेत मौलाना हाफिज रेहान रजा आणि हाफिज अब्दुस सलाम रशीदी यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. मानवता, परोपकार, गरजूंना मदत आणि बंधुभाव जपणे ही प्रेषितांची शिकवण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

युवकांचा नियोजनबद्ध सहभाग, नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या नियोजनामुळे मारेगावातील ईद-ए-मिलादुन्नबीचा सोहळा उत्साहपूर्ण व शांततामय वातावरणात संपन्न झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर