ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

आम्ही देवाला भेटायला गेलो अन् घरातला ‘देव’च हरपला; ‘ते’ दृश्य पाहून कुटुंबाचा आक्रोश, सोलापूर हादरलं!

11 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर – देवदर्शनासाठी कर्नाटकात गेलेलं कुटुंब देवाचं दर्शन घेऊन सुख, समृद्धी आणि समाधानाची आस मनात बाळगून घरी परतलं. मात्र, कुटुंबाला नियतीने असा धक्का दिला, ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. घरी पोहोचल्यावर घराचा दरवाजा उघडला आणि समोर दिसलेल्या विषण्ण दृश्यानं संपूर्ण कुटुंबाचं जगच उध्वस्त केलं. घराची काळजी घेणारे आणि कुटुंबाचा भक्कम आधार असणारे 61 वर्षीय अशोक भीमण्णा मुळे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. माढा तालुक्यातील जामगाव येथे 25 ऑगस्टच्या मध्यरात्री ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळे कुटुंब कर्नाटकातील देवदर्शनासाठी गेले होते. घरात अशोक मुळे हे एकटेच होते. 25 ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून अशोक मुळे यांची निर्घृण हत्या केली. देवदर्शन आटोपून आनंदाने घरी परतलेल्या कुटुंबीयांना जेव्हा घरात प्रवेश करताच रक्ताने माखलेला मृतदेह दिसला, तेव्हा संपूर्ण परिसरात एकाच टाहो पसरला. देवाचे दर्शन घेऊन आलेल्या डोळ्यांमध्ये एका क्षणात दुःखाचे अश्रू दाटले. "आम्ही देवाला भेटायला गेलो अन् इकडे आमच्या घरातला देवच हरपला," असा आक्रोश करत कुटुंबीयांनी फोडलेला टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकत होता.

42 वर्षांची महिला अन् 27 वर्षांचा तरुण, इन्स्टावर जुळलं, तिनं नवऱ्याला सोडलं अन्…, सोलापूरच्या प्रकरणाचा भयंकर शेवट

या दुर्दैवी घटनेत केवळ एका कर्त्या पुरुषाचा जीवच गेला नाही, तर चोरट्यांनी घरातील अडीच लाखांचा ऐवजही लुटून नेला. कपाटात ठेवलेली 2 लाख 40 हजारांची रोख रक्कम, 15 ग्रॅम वजनाचे लॉकेट, अर्ध्या तोळ्याच्या चार अंगठ्या, अर्धा तोळा वजनाची साखळी आणि बँकेचे कोरे चेक चोरट्यांनी लांबवले. याप्रकरणी विजयकुमार अशोक मुळे यांनी माढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. एका क्षणात सुखी संसार उध्वस्त करणाऱ्या या नराधम चोरांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जामगाव परिसरातून केली जात आहे.तर या घटनेचा अधिक तपास माढा पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर