ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ग्राम विकासाकरीता हवे योग्य नियोजन
भास्कर पेरे.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव येथे सरपंच मेळावा.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील आखिल भारतीय सरपंच परिषद मारेगाव यांच्या वतीने सरपंच मेळाव्याचे आयोजन दिनांक 11 मे 2022 ला करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच ग्राम पंचायत पाटोदा यांचे व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी सरपंचाची भुमिका कशी असावी हे विषद केले, तसेच योग्य नियोजन, जनतेशी संवाद, उत्पन्न वाढीचे साधने तयार करावीत, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अश्या अनेक विषयांबद्दल मार्गदर्शन केले.

यात सरपंच अरविंद ठाकरे यांनी विराजित खुर्चीवरून काम करतांना राजकिय हेवेदावे, विरोधक चुकीची माहिती देतात, प्राथमिक स्वरूपातील योजनांचा निधी अपुरा येत असल्याने विकासकामांना खिळ बसतो. शासकीय योजना राबवीत असताना प्रशासनातुन प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लाभधारकाला न्याय मिळत नाही. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती विकास कामापासून दुर राहिल्या आहेत, असे मनोगत या प्रसंगी व्यक्त केले आहेत.

सरपंच मेळाव्याला आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणा खंडाळकर, अनील देरकर, माजी प.स.सभापती शितल पोटे, कृउबास उपसभापती  नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, सरपंच अरविंद ठाकरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती गौरकर, भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे अँड. देव पाचभाई ,मारोती पाचभाई यासह तालुक्यातीलअसंख्य सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
 

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर