ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मार्की शिवारात विज पडून दोन बैल ठार

133 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान

ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी जामणी

काल रविवारी दिनांक 12 मे 2024 ला दुपारी 3 वाजेच्या दरम्यान विज कोसळून दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना मार्की शिवारात घडली आहे.

यावर्षी उन्हाळा सुरू असला तरी  दिवसा दोन दिवसा आड ढगाळ वातावरण वादळीवारा पाऊस नित्याची बाब झाली आहे.शेतात उन्हाळी मशागतीचे ,मुंग ,भुईमुग ज्वारी उन्हाळी पिकांच्या काढणीची लगबग चालू आहे.वादळी वारा पाऊस हा अडथळा ठरत आहे .काल दुपारी  झरी मार्की परिसरात अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

अशातच शेतकरी दिवाकर रामदास ढेंगळे रा.मार्की यांच्या शेतात चरायला गेलेली बैल जोडी पावसामुळे कडूलिंबाच्या झाडाखाली आडोशाला उभे असताना अचानक त्याचवेळी कडूलिंबाच्या झाडावर विज पडल्याने झाडाखाली असलेले दोन बैल जागीच ठार झाले.

या जोडी ची किंमत अंदाजे एक लाख रुपये असल्याची शेतकऱ्याला सांगितले आहे.ऐण हंगामाच्या वेळी दोनबैल मरण पावले आणि शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान असून  प्रशासनाने पंचनामा करून  शेतकऱ्या ला तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून  केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर