ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बेंबळा कॅनलमध्ये टँकर पलटी होऊन
चालकाचा जागीच मृत्यू.

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यामध्ये कुंभा परीसरात सुरु असलेल्या बेंबळा कालव्याचे सुरू असलेल्या कामांना पाणी पुरवठा करण्याकरिता जात असलेला टँकर कालव्यात पलटी झाला.यात टँकर चालक जागीच ठार झाला आहे.ही घटना दिनांक 24 मार्च रोज गुरूवारला दुपारच्या सुमारास घडली.
   सध्या मारेगाव तालुक्यामध्ये बेंबळा प्रकल्पाची कामे मोठया प्रमाणावर काही भागात सुरु आहेत.

आणी या साठी प्रशासना कडून ही जोरात प्रयत्न सुरु आहेत. त्यात तालुक्यातील कुंभा व टाकळी परिसरात बेबळा कालव्याच्या कामांसाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्याच प्रमाणे या कामांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याने भरलेला टँकर नेत असताना टँकर कालव्यात पलटी झाल्या मुळे चालक जागीच ठार झाला. ही घटना दिनांक 24 मार्चला गुरुवारी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास घडली आहे. व त्या अपघाता मध्ये मृत्यू झालेल्या चालकाचे नाव
शिवदास जयसिंग राठोड वय सुमारे 65 वर्ष आहे व तो रा. करंजी अशी माहिती प्राप्त झाली आहे.

या घटनेची माहिती पोलीस पाटील संगीता आदेवार यांनी मारेगाव पोलिसांना दिली.  माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. असून या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. व पोलीस येण्यापूर्वीच टँकर सूव्यवस्थित करून ठेवण्यात आल्यामुळे  नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करित आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर