ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मारेगांव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा एकरी ५०हजार रुपये  मदत जाहीर करा:नबी शेख.

105 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तहसीलदार दिपक पुंडे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणुन नावारुपास आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आदीवासी बहुल असलेला मारेगांव तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून कापुस उत्पादक तालुक्याची ओळख आहे.

मारेगांव तालुक्यातील शेतकरी पेरणीच्या वेळी पावसाचा लपंडाव होत होता त्यामुळे बळीराजावर दुबार, तिबार पेरणीने संकटात सापडला असल्याने कर्जबाजारी झाला आहे. पण तालुक्यात मागील १५  दिवसापासून दैनंदिन कोसळणाऱ्या पावसाच्या मुसळधार सरीने शेती क्षेत्राचे कमालीचे नुकसान झाले. शेतीला चक्क शेततळ्याचे स्वरुप आल्याने खरीपातील कापुस, तुर, सोयाबीन,मका, ज्वारी सह विविध पिकांचे कमालीचे झालेले नुकसान भरुन न निघनारे असल्याने जगाचा पोशिंदा कर्जबाजारी व हवालदील झाला आहे.

महाराष्ट्र सरकारने यांची गंभीर दखल घेवुन तात्काळ मारेगांव तालुक्यातील अतीवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी ५० हजार रुपये आर्थीक मदत जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष नबी शेख यांनी केले. ता.२१ला मारेगाव येथील तहसिलदार दीपक पुंडे यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

निवेदन देतांना मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे , शहर अध्यक्ष शेख नबी , चांद बहादे , समीर सय्यद,आकाश खामनकर,गौरव कोवे,रवी चौधरी ,सौरभ सोयाम,इब्राहिम शेख ,बबलू विरुटकर यांचे सह म.न.से.कार्यकर्ते उपस्थिती होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर