ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वाघांचे शेतकरी व जनावर हल्ले,जेरबंद करुन कायमस्वरूपी तोडगा काढावा

174 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जंगली डुकरांपासुन शेतकऱ्यांवर होणारे हल्ले व पिकांचे नुकसान थांबवण्यासाठी डुकरांना ठार मारण्याची परवानगी द्या राजेश्वर गोंड्रावार

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

पांढरकवडा वन विभागा अंतर्गत येणाऱ्या जामणी वनपरीक्षेत्रामध्ये मांडवी,चाटवण,जुनोनी,कारेगाव,पिवरडोल,गवारा तसेच संपूर्ण झरी जामणी तालुका हा आदिवासी बहुल असुन जंगलालगत आहे. सदर जंगलामध्ये सन २०१९ पासून वाघांचे वास्तव्य आहे.त्यावेळी वाघाची संख्या ही नगन्य होती त्यामुळे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना वाघाचा त्रास कमी होत.

परंतु सन २०२१ मध्ये वाघांची संख्या वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त त्रास होऊ लागला व त्याच वर्षी दि. ०९/०७/२०२१ रोजी पिवरडोल येथील रहिवाशी अविनाश पवन लेनगुळे यांचेवरती अगदी गावा लगत वाघाने हल्ला करून ठार केले.त्यामुळे ह्य घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही,आज रोजी आपल्या जंगलामध्ये अंदाजे ८ ते १० वाघांची संख्या असल्याचे निदर्शनास आले आहे.

मागील १५ दिवसांपासुन पिवरडोल,मांडवी,चाटवण,गवारा,कारेगाव या शिवारामध्ये वाघांचा मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे दिसून आले. दिनांक ०१/०७/२०२४ रोजी जुनोनी शिवारातील शेतकरी अनिल पत्रुजी बाटगुरे व पिवरडोल शिवारातील शेतकरी भारत भूमाजी गुरुनुले यांच्यावर दिनांक ०५/०७/२०२४ रोजी वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता दोनही शेतकरी हे पळ काढून घरी परत आले.


तसेच दिनांक ०८/०७/२०२४ रोजी जुनोनी शिवारातील शेतकरी संतोष निकोडे यांच्या शेतामध्ये डावरन करत असतांना अचानक वाघाने हन्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर दिनांक १०/०७/२०२४ रोजी चाटवण शिवारातील वामनराव जंगमवार यांच्या शेतामध्ये डांबररोड लगत सलग दोन दिवस रानडुकाराची शिकार करुन वास्तव्यास होता त्यामुळे वरील ४ ही घटनेमुळे परिसरात शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे शेतांमध्ये शेतीची कामे करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे तसेच वाघाची व रानडुकरांची दहशत असल्यामुळे मजुर शेतामध्ये काम करायला येत नसल्यामुळे शेती पडीत पडण्याची वेळ निर्माण झाली आहे.या सर्व घटनेवरून मनुष्य हानी जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सदर वाघांना जेरबंद करुन नेण्यात यावे तसेच जंगली डुकरांपासुन शेतकऱ्यांवर होणारे हल्ले व शेतातील पिकांचे नुकासन थांबण्यासठी यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा व रानडुकरांना मारण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजी सभापती रागेश्वर गोंड्रॉवार यांनी महाराष्ट्र राज्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनद्वारे केली आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर