ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ग्रामपंचायतचे ब्लॉक तोडून वाढीव बांधकाम करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा.

95 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

योगेश मडावी यांची मागणी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)


सविस्तर वृत्त असे की.
झरी जामणी : तालुक्यातील माथार्जुन ग्रामपंचायतचे हद्दीतील ग्रामपंचायतच्या मालकीचे ब्लॉक भाडेकरूने परवानगी न घेता असंविधानीक रित्या परिपक्व बांधकाम तोडून वाढीव बांधकाम केले असून त्याची चौकशी करून त्या भाडेकरुवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी.योगेश मडावी यांनी सोमवारी माथार्जुन ग्रामपंचायतचे सचिव मनोज दासरवार यांचे मार्फत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना केली आहे.


माथार्जुन ग्रामपंचायतने 12 वर्षापूर्वी हे ब्लॉक भाडेतत्त्वावर दिले. ग्रामपंचायतने दिलेल्या भाडे करारानुसार फक्त 11ते 12 महिने ग्रामपंचायत मार्फत दिले जाते त्यापेक्षा जास्त भाडे करारनामा करण्यास जिल्हा परिषद यवतमाळ यांची अनुमती घ्यावी लागते. ग्रामपंचायतचे व मडावी यांचे माहिती नुसार मागील 12 वर्षापासून भाडे कर (भाड्याची रक्कम) सुध्दा भाडेकरूने ग्रामपंचायत मध्ये जमा केले नाही. परंतू भाडेकरूने परिपक्व बांधकाम तोडून वाढीव बांधकाम केले असून प्रशासनाचे व ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष आहे

. संबंधित भाडेकरू कडून परिपक्क ब्लॉक बांधकाम तोडून ब्लॉक वाढविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाची व वरिष्ठ कार्यालय विभागाची अनुमती घेतली असल्यास अनुमती पत्र व वाढीव बांधकामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता व माथार्जुन ग्रामपंचायतचा ठराव अनुमती पारित केलेला ठराव साक्षांकित करून देण्यात यावे व हे सर्व दस्ताऐवज नसल्यास भाडेकरूने केलेल्या बांधकामाची चौकशी करून भाडेकरूवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश मडावी यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतचे सचिव मनोज दासरवार यांचे कडे करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर