ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

  रेल्वे गेटमनला मारहाण

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

  # मांगली रेल्वेगेट वरिल घटना.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

सविस्तर वृत्त असे की.

झरी जामनी तालुक्यातील मांगली येथील रेल्वे गेटवर ड्युटी करणाऱ्या गेटमॅनला एका व्यक्तीनेजबर मारहाण करून जखमी केल्याची घटना दिनांक 14 एप्रिला रात्रीच्या सुमारास घडली आहे. या बाबत मुकूटबन पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. मुकूटबन पासून सुमारे 8कि.मी अंतरावर असलेल्या मांगली येथील रेल्वे गेट नंबर 22 सी वर गेटमॅन म्हणून रेल्वे कर्मचारी धर्मेंद्रकुमार सिम्भूदयाल मीना वय सुमारे 28 वर्ष रा, रेल्वे कॉलनी मुकूटबन हे सायंकाळी 6 वाजताच्या शिफ्टमध्ये ड्युटीवर होता. रात्री सुमारे 8.30 वाजता दरम्यान रेल्वे येत असल्याचा त्यांना मॅसेज आला.

त्यामुळे त्यांनी रेल्वेरुट कुणीही ओलांडू नये म्हणून धर्मेंद्रकुमार ने रेल्वेगेट बंद केले. त्याच वेळी मुकूटबन येथील राहुल दुर्गे नामक युवक सुमारे वय 28 वर्ष मोपेड दुचाकी नंबर AP. 01 AC. 4518 घेऊन येथे मद्यधुंद अवस्थेत आला व रेल्वे फाटक उघड असे म्हणून रेल्वे कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ देणे सुरू केले. रेल्वे गाडी गेल्याशिवाय फाटक उघडता येणार नाही व पाच मिनिटात रेल्वे गाडी जाणार आहे. रेल्वेगाडी जाताच फाटक उघडतो असे कर्मचाऱ्यांनी सांगितले असता राहुल दुर्गे याने अंगावर धावत येऊन कर्मचारी धर्मेंद्रकुमार याला लाथाबुक्यांनी नाकावर व तोंडावर मारहाण केली.

या मध्ये धर्मेंद्रकुमार यांच्या नाक व तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या व गंभीर जखमी झाला. मारहाण करत असताना धर्मेंद्रकुमार याने आरडाओरड केल्याने राहुल दुर्गे दुचाकी घेऊन पळून गेला. काही वेळातच त्याच गेटवर ड्युटी करणारे कर्मचारी संजय लेडांगे, राकेश ताडुरवार व रंजितकुमार सिंग आले. रंजितकुमार सिंग यांच्यासोबत पोलीस स्टेशन गाठून राहुल दुर्गे विरुद्ध वरील प्रमाणे तक्रार दिली आहे. यावरून मुकूटबन पोलिसांनी संशयित आरोपी राहुल दुर्गे याचा विरुद्ध कलम ३५३ व ३३२ अंतर्गत गुन्हे दाखल केले असून जखमी धर्मेंद्रकुमार याला पांढरकवडा येथे पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान ,संदीप कुमरे ,प्रवीण तालकोकुलवार, संजय खांडेकर करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर