ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

येडशी ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार

139 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दुषित पाणीपुरवठा , हायमास्ट लाईट बंद , नाली सफाई कडे दुर्लक्ष.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- तालुक्यातील येडशी गावात सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे.सद्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे.पाण्याची पातळी खोल गेली आहे.त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.सद्या येडशी गावात ग्रामपंचायत चे शून्य टक्के नियोजन असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी गावातले काही हायमोस्ट (ट्रीट लाईट) बंद आहे.त्या कडे सुद्धा ग्रामपंचायत फिरून सुद्धा पाहत नसल्याचे दिसून येत आहे.मात्र लाईट बंद असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळेस त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे एक ते दीड वर्षे उलटून गेले मात्र गावामध्ये कोणतेही कामे मंजूर करून काम न केल्याचे दिसून येत आहे.सद्या कंपनी मार्फत एक R/O सुरू आहे.मात्र नदी वरून पाईप लाईन टाकून असल्याने नदी पात्रातील विहिरी मध्ये टाकलेली मोटर बाहेर काढून ती नदीमध्ये सोडण्यात आली आहे.

त्यामुळे जो नळाद्वारे पाणीपुरवठा होतो तो पूर्णपणे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे.जर गावामध्ये शुद्ध पाणी पुरवठा करायचा झाला तर ग्रामपंचायत ने ताबडतोब बोअर वेलची व्यवस्था करावी. जेणेकरून गावामध्ये शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकतो.कारण या दूषित पाण्या मुळे काहींना आजरांचा सामना देखील करावा लागत आहे.सद्या गावामध्ये R/O सुरू आहे.थंड पाणी नेण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्ती तिथे येतात आणि लोकांची गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे.

जेव्हा पासून गावामध्ये R/O सुरू झाला तेव्हा पासून प्रत्येक दुकानात पाच रुपयांच्या नाण्यांचा शार्टेज पहायला मिळत आहे.गावामध्ये सात ते आठ दुकाने आहेत मात्र त्यांचा कडे कधीही गेले तरी पाच रुपयांची नाणी उपलब्ध राहत नाही.
कारण गावामध्ये कोणताही व्यक्ती आला त्यांना पाण्याची आवश्यकता असते.मात्र दुकानांमध्ये पाच रुपयांची नाणी नसल्याने त्यांना खाली हात परतावे लागते.

याच कारण ही असच असू शकते.सर्व पाच रुपयांची नाणी R/O फिल्टर मध्ये आहे.गेले दोन महिन्या पासून R/O (ATM) कार्ड ग्रामपंचायत मध्ये जमा आहे.मात्र ग्रामपंचायत च्या अति भोंगळ कारभारा मुळे संपूर्ण गाव वैतागून आहे.जर वेळीच कार्ड धारकांना कार्ड वाटप केले असते तर पाच रुपयांच्या नाण्यांची टंचाई उपभोगली नसती.मात्र ग्रामपंचायत च्या कारभारामुळे गावकरी त्रस्त आहे. या गंभीर विषयाची त्वरित दखल घेण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे ..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर