ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलागूणही महत्वाचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरंवार.

101 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मार्डी येथील आदर्श हायस्कुल येथे बक्षीस वितरनादरम्यान विद्यार्थ्यांचे केले कौतुक.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव:विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव मिळालाच पाहिजे.त्यासाठी प्रत्येक शाळांनी तसा मंच या चिमुकल्यांना उपलब्ध करून दिला पाहिजे.अनेकांमध्ये जे उपजत गुण आहे, ते यनिमित्ताने प्रकट होऊ शकते असे उद्गार मारेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरंवार यांनी काढले.

ते मार्डी येथील आदर्श हायस्कूलमध्ये दि.23 ते 25 जानेवारी दरम्यान संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरनादरम्यान आपले विचार व्यक्त करीत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य विलास ताजने, माजी मुख्याध्यापक भास्करराव धानफुले, पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील, केंद्रप्रमुख ताटेवार सर, पालक संघाचे अध्यक्ष रत्नाकर जुमळे, समाजसेवक दिवाकर पंडिले, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख रमेश ढूमणे, नीतू मेश्राम उपस्थित होत्या.

यावेळी गटशिक्षणाधिकारी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपला मानसिक विकास तर करावाच पण त्यासोबतच शारीरिक विकासाकडेही लक्ष दिले पाहिजे. कारण शरीर सुदृढ तर मन सुदृढ. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी प्रगती करावी अशी अनेक क्षेत्रे आहे. फक्त आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे हे त्यांनी ठरवावे, आपले क्षेत्र निवडावे आणि त्यात प्रगती करावी असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी मंचावरील सर्व मान्यवरांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले.शाळेच्या परंपरेप्रमाणे एका गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय सैन्यामध्ये काश्मीर येथे सेवा बजावणाऱ्या मुरधोणी येथील वैभव चिंचोलकर यांचा सपत्नीक शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचा अविष्कार करीत रसिकांचे मन वेधले. काही कार्यक्रम खिळवून हसवत होते. तर काही डोळ्यात अंजन घालत होते. यातील एक थीम आई. या आई थीमने अक्षरशः अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले होते.

नृत्याचे परीक्षण एकनाथ येटी, अनंता शिवरकर, नीतू मेश्राम यांनी केले. संस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन रमेश ढूमणे तसेच बालू दातारकर यांनी केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुरेश नाखले यांनी, प्रास्ताविक अनंता शिवरकर यांनी तर आभार जगन भोंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर