ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दाहावीचा झरी जामणी तालुक्याचा निकाल 91.63 %

282 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सात शाळांचा निकाल शंभर टक्के

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे आज दिनांक 13 मे रोजी इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा निकाल ऑनलाईनही जाहीर झाला असून विद्यार्थी ऑनलाईन निकाल तपासून विद्यार्थी व त्यांचा पासकांनी आनंदोत्सव केला आहे .सोसल मिडियावर आपल्या पाल्याची गुणपत्रीका व्हायरल करून कौतुकाचा वर्षाव पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतांना पाहायला मिळत आहे.

दहावीचा ऑनलाइन  निकाल आज घोषित करण्यात आला आहे.या परिक्षेत ८३३ विद्यार्थी पास झाले आहेत.तालुक्यात २४ माध्यमिक विद्यालय आहे ,यात  एकूण ९२० विद्यार्थी शिक्षण घेत होते.त्या पैकी ९०९  विद्यार्थ्यांनी परिक्षेस बसले असुन ८३३ विद्यार्थी उतीर्ण झाले   आहे. या पैकी डीस्टीकशेन – १४० , प्रथम श्रेणी – २६७  , व्दितीय श्रेणी – ३१३  , पास ग्रेड- ११३ विद्यार्थी आहेत .तर ७६  विद्यार्थी   अनुतीर्ण झाले आहे.
 
तालुक्यातील २४ पैकी शाळांपैकी ७ शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे त्या पुढील प्रमाणे आहेत .राजीव माध्यमिक विद्यालय  कारेगाव  १८ विद्यार्थी, राजीव माध्यमिक विद्यालय  पाटण ५६ ,    शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा  शिबला ( पार्डी ) ५३  जिल्हा परिषद मा. विद्यालय  पाटण  ६ , जगन्नाथ सागर विद्यालय  कोसारा  (कायर)  ३५,  गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन ३३, आर्या इंटरनॅशनल स्कूल  मुकुटबन ३२  हे सर्व पैकी च्या पैकी विद्यार्थी चांगल्या गुणांनी उर्तीण झाले आहे. दर वर्षी प्रमाणे काही शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. मात्र मागील वर्षी प्रमाणे या ही वर्षी  सर्वात कमी निकाल शेतकरी विद्यालय बाळापुर या शाळेचा आहे. ३० पैकी २२ विद्यार्थी उतीर्ण झाले आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर