ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

अनंतपूर येथे अनेक समस्या ग्रामपंचायत प्रशासनाचे कायम दुर्लक्ष

152 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रस्त्याच्या बाजूला भुमिगत नाली सांडपाणी रस्त्यावर

आरो आहे पण शुद्ध पाणी नाही,आरो बनले शोभेची वस्तू

ज्ञानेश्वर आवारी :- उपसंपादक
विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क झरी (जामणी)

झरी जामणी तालुक्यात अनेक ग्राम पंचायतीनी गावाच्या विकासाच्या नावाखाली लाखो रुपयेचा निधी खर्च केला आहे.जन सुविधेच्या नावाखाली भूमिगत नाली,सिमेंट रोड,सार्वजनिक शौचालय,घनकचराव्यवस्थापन,सोलरलाईट,हायमास्टलाईट,वाटर फिल्टर इ .सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या व .बांधकामे करण्यात आली.परंतु प्रत्यक्षात बांधकाम व सुविधाची दुरावस्था आहे.
मात्र प्रत्यक्ष गावात गेले तर खरे चित्र पहायला मिळते.

झरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर छोटेसे अनंतपूर हे गाव असून हे गाव सुर्लाग्राम पंचायत मध्ये समाविष्ट आहे.शेवटच्या टोकावर असल्याने मुलभूत सुविधा अभाव दिसून येतो.या गावात सांडपाणी वाहून नेण्यासाठी मागील वर्षी मूमिगत नालीचे बांधकाम करण्यात आले.परंतु भूमिगत नाली नावालाच आहे.

बांधकाम करताना खोदकाम करून सिमेंट पाईप टाकणे गरजे असतांना वर -वर ठेवून चेंबर बांधण्यात आले आहे.रोड पेक्षा नालीचे बांधकाम उंच करण्यात आले आहे.हे बांधकाम अतिशय  निकृष्ट दर्जाचे असून एका वर्षात या चंबर व त्यावरी झाकण फूट तूट झाले आहे.चुकीच्या व निकृष्ठ नाली बांधकाम मुळे पाणी नालीतून जाण्या ऐवजी  रस्त्यावरून वाहतांना दिसत आहे.

लोकांना चिखल तुडवत रस्त्याने जावे लागत आहे.बाराही महिने वाहणाऱ्या घाण दुर्गंध सांडपाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.भूमिगत नाली कोणाच्या फायद्याची हे वेगळे सांगायला नको ग्राम वासीयांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी दोन वर्षा आधी आठ लाख निधी खर्च करून आरो आरो वॉटर फिल्टर लावले.काही दिवस बंद चालू अशी अवस्था होती मात्र आता सहा महिने झाले तेही कायमे बंद आहे.

उलट गावाकऱ्यांचा नशीबअशुद्ध व क्षारयुक्त पाणी आहे .उपयोग काही नसल्याने ‘विकणे आहे ‘ संपर्क साधा असे त्यावर लिहून रोष व्यक्त केला आहे. हजारो रुपये  खर्च करून लोकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने रविद्र काकडे,
सुरेश पाचभाई,अभय धोबे,अण्णाजी आस्वले, बाळकृष्ण डोहे यांचे सह अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासना विषयी रोष व्यक्त केला आहे.

चौकट..
जवळ जवळ  हीच तालुक्यातील अनेक गावाची परिस्थिती आहे.केवळ कागदोपत्री विकासाचा बागुलबुवा करून,बोगस व निकृष्ट दर्जाची कामे करून निधी खर्च केला जात असून या भ्रष्ट यंत्रणेतला अधिकारी जबाबदार आहे.अनेक ग्रामपंचायती पैसा हडप केल्याचा तक्रारी आहेत पण अधिकारी न्याय देण्यासाठी असमर्थ असल्याचे चित्र आहे.व्यवस्थेबद्दल जनमाणसात रोष व्यक्त केला जात आहे.


      

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर