ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

भरधाव टाटा सुमोच्या धडकेत बालीका गंभीर जखमी

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वसंतनगर (वागधरा) येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव : पांढरकवड्याकडून वसंतनगर वागधऱ्या कडे जाणाऱ्या मार्गांवर चारचाकी टाटा सुमो गोल्ड वाहनाने धडक दिल्याने 15 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली. रत्नमाला पुणाजी मेश्राम 15 रा. वागधरा ता.मारेगाव जि.यवतमाळ असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना दिनांक 2 मे 2022 रोजी सोमवारला 6 वाजता सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की. रत्नमाला ही गावाशेजारी रोडच्या बाजुला बकऱ्या चारत होती. दरम्यान,पांढरकवडाहुन सुमो गोल्ड कंपनीचे वाहन क्रमांक MH. 34 AV.9545 या भरधाव येणाऱ्या वाहनाने  जोरदार धडक दिली, या धडकेत 15 वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ नागरीकांनी उपचारासाठी उमरी येथील येशू ख्रिस्त रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तूर्तास रत्नमालाचे दोन्ही पाय फॅक्चर असल्याची माहिती आहे.

या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरून वाहन चालकासह चारचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले.
सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलिस करित आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर