ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जळका फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रकची बसला जोरदार धडक

5.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बसचे दोन तुकडे, अनेक जखमी

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील जळका फाट्या जवळ गुरुवारी (दि. ४ डिसेंबर २०२५) रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. वणी–करंजी मार्गावर वणीहून करंजीकडे जात असलेल्या एस.टी. बसला करंजीकडून वणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले असून समोरचा भाग पूर्णपणे चिरडला गेला.

या अपघातात बसचालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.


अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस पथक व रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थांनीही तत्परता दाखवत बसच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. सर्व जखमी प्रवाशांना मारेगाव व करंजी येथील ग्रामीण रुग्णालयांत उपचारासाठी हलविण्यात आले.

अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ट्रक चालकाचा ताबा घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.स्थानिक नागरिकांनी या मार्गावरील वाढत्या अपघातांची दखल घेऊन वाहतूक विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर