ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

बोटोणी ते सराठी रस्त्यावरील कडू लिंबाचे झाड उचलणार कोण.

182 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सबंधित विभागाचे दुर्लक्ष ये-जा करणाऱ्या नागरिकांत रोष.

विदर्भ SP न्युज मारेगांव,✍️

सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील बोटोणी ते सराठी या रस्त्यावर मागील 3 दिवसापासून एक झाड पडून आहे. परंतु 3 दिवस उलटून गेले तरी अजून पर्यंत झाड उचलल्या न गेल्याने नागरिकांमध्ये रोष उत्पन्न होत आहे.हे पडलेले झाड उचलायची जबाबदारी कोणाची हा प्रश्न नागरिक विचारतांना दिसत आहे.

तालुक्यातील आदिवासी गावांना जोडणारा बोटोणी ते सराठी हा रस्ता समोर आदिवासी गावांना जोडला जातो.या रस्त्यावर दिनांक 26 एप्रिल 2023 रोज बुधवारला रात्री 9 वाजता सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली होती त्या हवेच्या झोक्याने एक झाड पडले.हे झाड सराठी गावापासून सुमारे 500 मिटर अंतरावर एक कडू लिंबाचे झाड रस्त्यात आडवे पडलेले आहे.

“पण 36 तासच्या वर वेळ होऊनही ते झाड रस्त्यात जसेच्या तसे पडलेले आहे हे विशेष.”त्या मुळे ये-जा करणाऱ्याला मोठ्या प्रमाणात कसरत करत आपले वाहन त्या ठिकाणावरुण काढावे लागत आहे.आणि रात्रीच्या वेळी त्या झाडामुळे दुचाकी किंवा चारचाकी गाडीचा अपघात होऊन एखाद्याला अपंगत्व येण्याची दाट शक्यता आहे.

मात्र संबंधित विभाग गाढ झोपेत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.व त्या झाडामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सबंधित विभागाने लवकरात लवकर त्या झाडाचा बंदोबस्त करून रस्ता सुरळीत सुरू करून द्यावा अशी परीसरात नागरिकांची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर