ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

‘एक गाव, एक कृषी अवजारे बँक’ योजनेसाठी महिला बचत गटांना सुवर्णसंधी

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करा

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:गावपातळीवर कृषी यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘एक गाव, एक कृषी अवजारे बँक’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी महिला शेतकरी बचत गटांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिला बचत गटांनी ५ एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा – २) अंतर्गत जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत आहे. मारेगाव तालुक्यातील धामणी, बोरी (खू), मदनापूर, भालेवाडी, मच्छिंद्र, बामर्डा, फेपरवाडा, मार्डी, डोंगरगाव, लाखापूर, चिंचाळा, पाथरी, वरुड, सालेभट्टी, गोंडबुरांडा, पहापळ, डोल डोंगरगाव, कान्हाळगाव (उ), आकापूर, नरसाळा, वनोजादेवी, वडगाव, पिसगाव व पांढरकवडा या गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत गावपातळीवर नोंदणीकृत महिला बचत गटांमार्फत कृषी अवजारे बँक स्थापन करून विविध कृषी यंत्रे व अवजारे शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची सुविधा निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करता येणार असून कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे या योजनेत कृषी अवजारांच्या एकूण किमतीवर तब्बल ६० टक्के अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. त्यामुळे महिला बचत गटांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार असून गावात रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.

महिला बचत गटांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे, उपविभागीय कृषी अधिकारी चंदन निघोट तसेच तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर