ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पि एम किसान व अतिवृष्टी मदत खात्यात जमा.

342 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दिवाळीच्या तोंडावर बॅका मध्ये गर्दी.

दिवस रात्र रावून रक्कम देण्याचा बँक कर्मचाऱ्याचा प्रयत्न.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी:- शेतकऱ्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी सोमवारपासून राज्य सरकारने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरभाई अनुदानाची रक्कम जमा करायाला सुरुवात केली . मिळणारी मदत प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये देण्याची घोषणा केली आहे.

परंतु नुकसानीची पातळी लक्षात समाधानकारक रक्कम जमा केली जात आहे.त्या सोबत प्रधानमंत्री किसान योजनेचा योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्याचे नावे जमा करण्यात आला आहे.त्याच बरोबर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान निधी अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार सुद्धा इतक्यातच देण्यात येणार आहे.दिवाळीच्या तोंडावर आली आहे.

यावर्षी पावसाने पावसाने पिकांचे नुकसान झाले.यातून वाचविलेले उरले सुरले सोयाबीन काढणीला पावसाचा व्यत्यय येत आहे.कापुस निघाला नाही.शेतीचा व मुजरांचा खर्च दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न पडला असताना ही मदत शेतकऱ्यांना साठी महत्वाची ठरली आहे.शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त केले जात असून बँकेत पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली आहे.

त्यासाठी बँकेची कर्मचारी सुद्धा रात्री सात आठ वाजेपर्यंत बँक चालू ठेवून पैसे देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.बुधवार आठवडी बाजाराच्या दिवशी झरीत जिल्हा मध्यवर्ती बँक व बँक ऑफ महाराष्ट्र व विदर्भ कोकण या तिन्ही बँकेमध्ये दिवसभर गर्दी दिसून आली आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर