ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मारेगावात समाजोपयोगी पाणपोईचे थाटात उद्घाटन

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा; “जल ही जीवन आहे”चा संदेश

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव, दि. 28 मार्च — वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर मारेगावात नागरिकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या पाणपोईचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. स्वर्गीय मारोती पाटील रोगे व स्वर्गीय सुंदराबाई रोगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दयालभाऊ रोगे यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

मारेगाव येथील पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंप समोर उभारलेल्या या पाणपोईचे उद्घाटन तहसीलदार उत्तमराव निलावाड यांच्या हस्ते शनिवारी सकाळी 11:15 वाजता पार पडले. यावेळी “जल ही जीवन आहे” हा संदेश देत समाजोपयोगी कार्यातून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

उद्घाटन प्रसंगी दयालभाऊ रोगे, पंकज पिदुरकर, रोशन मोते, पोलिस कर्मचारी विठ्ठल बुरुजवाजे तसेच पेट्रोल पंपवरील कर्मचारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.

या पाणपोईमुळे परिसरातील नागरिक, प्रवासी व वाहनचालकांना उन्हाळ्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. मारेगावात अशा प्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर