ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

संजय खाडे यांच्या प्रचारासाठी पत्नी संगीता खाडे मैदानात

249 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महिलाशक्तींनी पिंजून काढले वणी शहर,रोज विविध गावांचा दौरा

तालुका प्रतिनिधी वणी

वणी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. प्रचारासाठी आता अवघा अवघा आठवडा उरला आहे. सभा, बैठका आणि मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या पत्नी संगीता खाडे या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. सध्या त्या वणी विधानसभा क्षेत्रातील वणी शहर व ग्रामीण भागात गावसभा घेत संजय खाडे यांच्या विजयासाठी आवाहन करीत आहे. यात त्यांना माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या पत्नी किरण नांदेकर तसेच महिलाशक्तीची साथ मिळाली आहे.

संगीता खाडे या त्यांच्या सहकारी महिलांसह रोज प्रचार करीत आहे. कधी वणी शहर तर कधी ग्रामीण भागाचा त्यांचा दौरा असतो. जवळपास 25 जणांची त्यांची चूम आहे. त्यांच्या प्रचारात पदयात्रा, बैठका, कॉर्नरसभा तसेच गृहभेटींचा समावेश आहे. ही चमू घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. महिला थेट भेटीला येत असल्याने गावकरी महिला देखील या चमुशी मुक्तपणे संवाद साधतात.

आता पर्यत या महिलांच्या चमुनी संपूर्ण वणी शहर पिंजून काढले आहे. सध्या त्यांचा ग्रामीण भागातील दौरा सुरु आहे. आतापर्यंत नांदेपेरा, दहेगाव, वागदरा, लालगुडा इत्यादी गावांचा या चमुनी दौरा केला आहे. त्यांच्या प्रचाराला महिलांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही बाब अतिशय चर्चेची ठरत आहे. प्रचार दौ-यात महिला सक्षमीकरण, आरोग्य, रोजगार, शिक्षण, स्वयंरोजगार इत्यादी महिलांच्या विषयांचा भर असतो.

प्रचार दौ-यात कविता चटकी, सुनिता बोढे, किरण नांदेकर, उषा पेचे, वंदना भोंगळे, रुपाली खाडे, निता शिवरकर, सुनंदा शिवरकर, सविता सोनवणे, वर्षा खाडे, स्वाती निखाडे, प्रतिभा झाडे, सीमा आवारी, भाग्येश्री वैद्य, गंगुबाई बनसागर, लता रजपूत, निता पारशीवे, जया शिवरकर, सुनंदा खाडे, विजया आगबत्तलवार, आशा टोंगे, मंदा बांगरे, प्रमिला चौधरी, ज्योत्स्ना आचार्य, सुरेखा वडिचार यांच्यासह किरण नांदेकर यांच्या सहकारी यांचा समावेश आहे. 

मंगळवारी संजय खाडे यांचा लाठी-शिंदोला सर्कलमध्ये प्रचार
मंगळवारी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी संजय खाडे यांनी शिरपूर-शिंदोला सर्कलमध्ये प्रचार दौरा झाला. या प्रचार दौ-यात त्यांनी मंदर, केसुर्ली, चारगाव, वारगाव, पुरड, पुनवट, नायगाव, सावंगी, चिंचोली, शिवनी, येनाडी, कोलगाव, साखरा, माथोली, कैलाशनगर या गावांचा दौरा केला. तर बुधवारी त्यांचा मार्डी सर्कलमध्ये प्रचार आहे. सकाळी वनोजा देवी पासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यानंतर गोरज, दांडगाव, आपटी, मुक्टा, हिवरा, कानडा, शिवणी धोबे, चनोडा, चोपण, कानडा येथील दौरा आहे. तर मार्डी येथे कॉर्नर सभेने प्रचाराची सांगता होणार आहे. तर संध्या. 5 वाजता झरी येथील बिरसा मुंडा चौकात कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर