ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

मारेगांव येथे लाईनमन दिवस मोठ्या उत्साहात साजरा…

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महावितरण कार्यालय मारेगांव येथे लाईनमनचा सत्कार, समारंभ संपन्न झाला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिलांचा पण सत्कार करण्यात आला.

सुरेश पाचभाई मारेगांव:- महावितरण भारत सरकारचे आदेशान्वये सर्व सार्वजनिक व खाजगी विद्युत क्षेत्रातील सेवा असलेल्या लाईनमनच्या सेवेची दखल घेऊन त्यांच्या कामाप्रती सदभावना व्यक्त करण्यासाठी शनिवार दिनांक 4 मार्च 2023 हा दिवस लाईनमन दिवस म्हणुन मारेगांव येथील उपविभागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

विजेसारख्या अती महत्वाच्या क्षेत्रात जिवाची बाजी लावून अहोरात्र वीजपुरवठा सुरळीत ठेवणार्या लाईनमन प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 4 मार्च हा दिवस “लाईनमन दिवस” म्हणून पाळण्याचे शासनाने ठरविले आहे.त्या अनुषंगाने मारेगांव उपविभागा तर्फे कर्मचाऱ्याचा सत्कार, समारंभ संपन्न झाला.शहरकला गुणांना वाव मिळण्यासाठी विविध खेळांचे आयोजन व सुरक्षा प्रतिज्ञा दिली.

काल शनिवार दिनांक 4 मार्च 2023 सायंकाळी 6 वाजता पासुन कार्यक्रमाला सुरुवात झाली होती.हा कार्यक्रम 33/11 KV उपकेंद्र घोन्सा रोड मारेगांव (कान्हाळगांव) येथील कार्यालय परिसरातील साजरा करण्यात आला.उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून हा कार्यक्रम साजरा केला.उपस्थितांनी मनोगत व्यक्त करतांना वीज ग्राहकास चांगल्यात चांगली सेवा देऊन भविष्यातील ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने पेलण्याचा संकल्प केल्या.

या कार्यक्रमास कार्यक्रमांचे उद्घाटक नरेंद्रजी कटारे कार्यकारी अभियंता पांढरकवडा विभाग हे होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेंद्रकुमार पाटील उपकार्यकारी अभियंता मारेगांव उपविभाग हे होते तसेच रविंद्रजी खोंडे सहाय्यक अभियंता मारेगांव उपविभाग,गजेंद्र कुर्लेवार सहाय्यक अभियंता मारेगांव(शहर)

आशिष पवार कनिष्ठ अभियंता मारेगांव (ग्रामीण),उमेश भोयर मुख्यतंत्रज्ञ उपविभाग मारेगांव,लाईनमन पवन पानघाटे प्रधानतंत्रज्ञ, सपना खाडे वरीष्ठ तंत्रज्ञ,प्रफुल रासेकर प्रधानतंत्रज्ञ,तुषार जीवतोडे वरीष्ठ तंत्रज्ञ,राजकुमार भरणे,आशिष बदखल,भिमेश फुलझेले,चंपत टेकाम,अजय नान्हे,रोहीत गौरकार,विष्णु घोडके,प्रशांत वाढई, आनंद भगत,सतीश मस्की,युवराज वरने,एल.बी.भगत, सुनिल तेलंग, प्रमोद पारेलवार,एस.टी.अहमद,

शैलेश जुमनाके,महादेव गव्हाने,अनिल परचाके,ग्रामीण विभाग प्रफुल रासेकर, एम.बी.कातकडे,योगेश किनाके,जी.पी.वैद्य,गजानन राठोड,उमेश कनाके, मेघा मडावी,प्रणाली ठाकरे,अंकुश माडेकर,गिरीश पाचभाई,यू.एम.महाजन, के.एन. गजभे,जी.एम.बोबडे, सुरज गमे,यांचे सह सर्व कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ,सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.सुत्र संचालन ज्ञानेश्वर बिहाडे यांनी केले.तर आभार सुरज गमे यांनी मानले या वेळी सर्व कर्मचारी उपविभाग मारेगांव,हे उपस्थित होते.





ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर