ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

करंजी येथे ट्रकची दुचाकीला भीषण धडक दुचकीस्वार पुरुष व महिला जगीच ठार.

134 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी:केळापुर

केळापुर तालुक्यातील : करंजी गावा जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर ट्रक आणि दुचाकीच्या जबरदस्त धडकेत एक पुरुष व एक महीला जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना आज गुरुवरला दिनांक 17 नोव्हेंबर 2022  दुपाच्या सुमारास घडली आहे.

नागपूरकडून हैदराबादकडे जाणारा ट्रक क्रमांक UP 92 T 3569 व गडचांदूर येथील मोटरसायकल क्रमांक MH 34 BX 6739 यांचा भीषण अपघात झाला. दरम्यान या अपघातात मोटरसायकलवर जात असलेले गोकुळदास शामराव लांडगे वय सुमारे 45 वर्ष रा. वैशाली नगर गडचांदुर जि.चंद्रपूर व सोबतची एका महीलेची ओळख पटली नाही.

दुचकीस्वारा जवळील आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वरुण ओळख पटली आहे. ह्या दुर्दैवी घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर महिलेला दवाखान्यात नेत असताना रस्त्यात मृत्यू झाल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.घटनेची माहिती परीसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

या घटनेची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर