ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

गळफास घेवुन युवतीची आत्महत्या.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

हिवरा (मजरा) शेतशिवारातील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही. हिवरा(मजरा)येथील एका 18 वर्षीय युवतीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 2 जानेवारी 2023 रोज सोमवारला दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की..
कु.प्रांजली राजू बोढे वय सुमारे 18 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.कु.प्रांजली एका कॉलेजला बारावी मध्ये शिक्षण घेत होती.वडिल शेतकरी असल्यामुळे शेतात वडिलांना ती शेतीकामात हातभार लावायची.नेहमीप्रमाणे ती आज दिनांक 2 जानेवारी 2023 रोज सोमवारला शेतात काम करण्यासाठी गेली होती.

दुपारी दोन वाजताच्या सुमारास ती बैलाला पाणी पाजून आणतो म्हणून आईवडिलां पासून काही अंतरावर दुसऱ्या शेतामध्ये गेली.काही वेळाने कुटुंबातील काही व्यक्ती सुद्धा त्या शेतात काम करण्यासाठी गेले असताना त्यांना प्रांजली ही शेतात असलेल्या झोपडीत दोराच्या सहाय्याने गळफास घेवून असल्याचे निदर्शनास आले.

नातेवाईकांनी या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले, पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.वृत्त लिही पर्यंत आत्महत्येचे कारण कळु शकले नाही.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर