ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ग्रामसभा कोष समिती सदस्याचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न.

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव :यशदा पुणे तसेच जिल्हा परिषद यवतमाळ व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र पुसद यांचे सयुक्त विद्यमाने पंचायत समिती मारेगाव येथे पेसा ग्रामसभा कोष समितीच्या सदस्याचे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत दि.३०ते ३१ जानेवारी ला दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.

केंद्र शासनाने ७३ वी घटनादुरुस्ती करून पंचायती राज संस्थाचे बळकटीकरण करण्याचा एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला. त्यामुळे लोकसहभागातून अनुसूचित क्षेत्राचा विकास साधन्यांची एक संधी पेसा गावातील आदिवासीना मिळाली आहे.

पेसा कायदा हा आदिवासीच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतो.आदिवासी समाज अजूनही सामूहिकरीत्या निर्णय घेत असल्याने ग्रामसभेच्या माध्यमातून तो गावाच्या विकासाचे निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.१९९६ मध्ये पंचायत क्षेत्र विस्तार कायदा परित झाल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या कायदयाचे नियम तयार केले असून ते दिनांक ४मार्च २०१४ रोजी प्रसिद्ध केले आहेत.

तरीही अजून पर्यंत पाहिजे तसी कायदयाची अमलबजावणी प्रशासनाकडून होतानी दिसत नाहीत. मारेगाव तालुक्यात एकूण २५ पेसा ग्रामपंचायत आहेत. पेसा ग्रामपंचायत मध्ये पेसा कोष समिती ही महत्वाची समिती असून त्या समितीला गावाच्या लोक संख्या नुसार मोठया प्रमाणात गाव विकासासाठी निधी येतात.

पण बऱ्याच ग्रामपंचायतिने अजूनही पूर्ण निधी गावं विकासासाठी वापरल्याचे दिसून येत नाहीत. किंवा बऱ्याच पेसा ग्रामपंचायतिने त्या निधीचा खर्च केला असेल तर त्यांच्या पेसा कोष समितीलाही त्याची माहिती सुद्धा नसल्याचे अनेक पेसा कोष समितीच्या सदस्यांनी चर्चेत सांगितले आहेत.

अजूनही त्या सदस्यांना त्यांच्या अधिकाराबाबत माहिती सुद्धा नसल्याचे चित्र तालुक्यातील पेसा कोष समितीच्या सदस्यामध्ये दिसत आहेत.करिता त्या पेसा कोष समितीच्या सदस्यांना त्यांच्या अधिकाराची माहिती मिळणे अत्यंत गरजेचे असल्याने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत मारेगाव येथे ग्रामसभा कोष समितीचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.

सदरहू प्रशिक्षणाचे उदघाटन गटविकास अधिकारी गजलवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.प्रशिक्षणाचे संचालन सत्र संचालक पी.आर.टी.सी.चे निदेशक संजय राठोड यांनी केले.या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये यशदा पुणे प्रविण्य प्रशिक्षक सुभाष पवार,मदन गेडाम,मारोती पाचभाई,संतोष आस्वले यांनी पंचायत क्षेत्रविस्तार कायदा १९९६ यांचे ठळक वैशिष्ट्ये पूर्ण इतिहास,नियम २०१४ पेसा क्षेत्रविस्तार कायदयातील महत्वाच्या तरतुदी,ग्रामसभा त्याचे अधिकार अस्या अनेक महत्वाचे व मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

या मुळे आता पेसा कोष समितीच्या सदस्यांना त्यांच्या अधिकाराची बरीच माहिती मिळाल्याने उपस्थितानी आयोजकाचे खूप आभार मानले.या प्रशिक्षण शिबिराचा दोनही दिवस एकूण २५ गावाच्या पेसा समितीने उपस्थित राहून लाभ घेतला.आता प्रत्येक गावातील पेसा कोष समित्या सक्रिय होऊन आपआपल्या गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलल्या जात होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर