ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार एक जखमी

1.9k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पिसगाव ते पाथरी दरम्यान अपघात

सुरेश पाचभाई मारेगाव,



मारेगाव तालुक्यातील पिसगाव ते पाथरी दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक  ठार तर, एक जखमी झाल्याची घटना दिनांक 31 मे 2025 रोज शनिवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

मोहन जयराम पाचभाई वय अंदाजे 54 वर्ष रा. पिसगाव ता.मारेगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर शामराव मालेकार रा.भालेवाडी बेडा असे जखमी चे नाव आहे.


मोहन पाचभाई हे काल सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे कामासाठी  दुचाकीने मारेगाव येथे गेले होते.तेथील काम आटोपून ते सायंकाळी पीसगावकडे येत होते. त्याचवेळी भालेवाडी येथील मालेकर हे भारधाव वेगाने दुचाकीने मार्डी कडून येत होते.अशातच पिसगाव ते पाथरी दरम्यान रस्त्यात यांच्या दुचाकी समोरासमोर एकमेकांना धडकल्या.या अपघातात  मोहन पाचभाई ठार झाले. तर,एक जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच काही नागरिकांनी त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथामिक उपचारास दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वणी येथील खासगी दवाखान्यात हलविले.पण तेथील डॉक्टरांनी तपासून मोहन यांना मृत घोषित केले.

सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळतात मारेगाव पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.या घटनेने पिसगाव येथे शोककळा पसरली. सदर घटनेचा तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शंकर बारेकर करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर