ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

व्हॅलेंटाईन डे लाच प्रियकराला अटक.

123 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

लग्नाचे आमिष देऊन शोषण केल्याची तक्रार.

सुरेश पाचभाई मारेगांव:नातेवाईकांच्या घराजवळ राहणाऱ्या एका मुलीला लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केले.चार वर्षानंतर जेव्हा मुलीने लग्नाची गळ घातली तेव्हा मुलाने चक्क हात वर केले.त्यामुळे खोट्या प्रेमाच्या आणाभाकांना कंटाळलेल्या मुलीने अखेर मारेगांव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

मारेगांव येथील एका 23 वर्षीय युवतीचे व गणेशपूर (वणी) येथील 24 वर्षीय युवक यांचे 4 वर्षांआधी पासुन प्रेम सबंध होते.प्रेमाला उपमा नाही असे म्हणतात ते खरेच.प्रेमामध्ये काय होईल ते सांगता येत नाही.अशीच एक घटना घडली आहे.

मुलींच्या घराजवळ त्या मुलाचे नातेवाईक राहते.तो नातेवाईकांकडे वणी तालुक्यातील गणेशपूर येथील अंकित हनुमान सोयाम वय 24 वर्षे हा नेहमी यायचा.त्याचे बाजुच्या मुलीशी बोलणे वाढले.त्यातूनच प्रेम संबंध वाढले.त्यामुळे त्याचेही येणेजाणे वाढले. प्रेम बहरायला लागले.यातून शारीरिक ओढ निर्माण झाली.अशातच लग्नाच्या आणाभाका घेतल्या.पाहता पाहता चार वर्षे उलटली.

आणि एक दिवस मुलीच्या घरी कोणीही नसताना हा तिला भेटायला जायचा दरम्यान दिनांक 29 जानेवारी 2023 ला तो नेहमीप्रमाणे प्रियकर हा प्रेयसीच्या घरी आला.त्याने बळजबरीने मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. आणि मी तुझ्याशी लग्न करीत नाही असे सांगितले.आणि तुझे आईवडील माझे काहीही करत नाही अशी धमकी दिली.

चार वर्षाचे प्रेम असे तुटतांना पाहतांना मुलीच्या ह्रदयाचा तीळपापड झाला.तिने ही घटना आपल्या आईवडिलांना सांगीतली व मुलीने पालकाला सोबत घेवुन थेट मारेगांव पोलीस ठाणे गाठले. व तक्रार दाखल केली.झालेल्या प्रकरणावरून पोलिसांनी प्रियकर आरोपी अंकित हनुमान सोयाम वय 24 वर्ष यांचेवर लैंगिक अत्याचार कलम 376,376 (3) 506 भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनाखाली जमादार रामकृष्ण वेट्टे करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर