ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

सरपंचांनी दिला नवनियुक्त निरीक्षकांना ध्वजारोहणाचा मान

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) गावात एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. नेहमीप्रमाणे सरपंचांकडून ध्वजारोहण न करता, गावचे भूषण ठरलेल्या नवनियुक्त शासकीय अधिकाऱ्याला हा मान देत ग्रामपंचायतीने समाजापुढे आदर्श ठेवला.

बोरी (गदाजी) येथील कन्या दर्शना उत्तम पिंपळकर हिने नुकतीच एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत अमरावती येथील राज्य परिवहन कार्यालयात (आर.टी.ओ.) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर नियुक्ती मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाची दखल घेत सरपंच प्रविण नान्ने यांनी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान दर्शनाला देत तिचा जाहीर गौरव केला.

गावातील युवक-युवतींना प्रेरणा मिळावी, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा या उद्देशाने सरपंच प्रविण नान्ने यांनी हा उपक्रम राबविला. “गावाचे नाव उज्वल करणाऱ्या गुणवंतांना मान देणे हीच खरी राष्ट्रसेवा” अशी भावना यामागे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सरपंच प्रविण नान्ने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या राष्ट्रध्वजारोहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच प्रदीप साबरे, ग्रामपंचायत सदस्य अनिता राजुरकर,

छाया राऊत, चंद्रकला गेडाम, शांताबाई निखाडे, गंगा करडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रसिका राजुरकर, ज्येष्ठ नागरिक भाऊराव पिंपळशेंडे, तसेच विजय गेडाम, सूर्यभान नान्ने, विनोद राजुरकर, सागर घोटकर, जेवण साबरे, उत्तम पिंपळकर, विजय नान्ने, मारोती पेंदाम, भैय्याजी चौधरी, मुख्याध्यापक खडसे, शिक्षक कळसकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनाच्या प्रोटोकॉलनुसार ध्वजारोहणाचा अधिकार सरपंचांना असतानाही, तो अधिकार गुणवंत युवतीला बहाल करून युवकांना प्रोत्साहन देण्याचा संदेश दिल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बोरी (गदाजी) गावाने दिलेला हा सन्मान निश्चितच इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर