ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

शिवणाळा शेतशिवारात वाघाने पाडला गाईचा पडशा.

178 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील शिवणाळा येथील शेतशिवारात काल दिनांक 3 मार्च 2023 रोज शुक्रवारला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. शेतकरी आज दिनांक 4 मार्च 2023 रोज शनिवारला सकाळी शेतात गेले असता घटना उगडकिस आली.पुन्हा परिसरात वाघाने एंट्री केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



सध्या शिवणाळा परिसरातील व गावातली अनेकाने उन्हाळा असल्याने आपआपले पशुधन शेतातली गोठ्यात बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यातच शिवणाळा येथील शेतकरी कांन्हु लेतु आत्राम रा.शिवणाळा यांचे शेत गट नंबर 58 मध्ये नेहमी प्रमाणे गाय बांधलेले होती त्यांचे कडे 12 एकर शेती आहे.यांच्या मालकीहक्काची गाय ही शिवणाळा जंगला जवळील शेतशिवारात गोठ्यात बांधुन होती.

अशातच रात्रीच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या वाघाने गायीवर हल्ला चढवून ठार केल्याची घटना दिनांक 3 मार्च 2023 रोज शुक्रवारला रात्रीच्या सुमारास घडली असुन ती आज सकाळी शेतकऱ्याचा निदर्शनास येताच घटना उघडकीस आली मालकाने त्वरीत वन विभागाला घटनेच्या संदर्भात माहिती दिली.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवुन पंचनामा सुरू केला आहे.

शेतकरी पशुधन मालक कांन्हु लेतु आत्राम यांच्या मालकीची गाय असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.गाईचा वाघाने पडशा पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.परिसरात पुन्हा वाघाचे आगमन झाल्याने वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

प्रतिक्रिया..
शिवणाळा परीसरात वाघ आहे. “जनजागृती” जंगलात मोहफुल गोळा करण्यासाठी जात असेल तर सकाळी लवकर जावू नये कारण वन्य प्राण्यांच्या धोका असतो.जंगलात जात असताना सावधगिरी बाळगावी जंगलाला आग लावू नये.मोहफूल गोळा करण्यासाठी झाळा खालची जागा झाडून सफा करावी आग लावू नये आग लागल्यास विझवण्यास मदत करावी असे आवाहन शंकर ग. हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर