ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

आमदार बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली झरीत वर्षिक सभा.

84 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महा आवास अभियान पुरस्कार वितरण व पाणी टंचाईचा घेतला आठवा.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी सर्वप्रथम महा आवास अभियानांतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला व तीन महिन्याच्या आत आपल्या घरकुलाचे काम पूर्ण केले अश्या लाभार्थ्यांचा यावेळी प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

उन्हाची तीव्रता वाढत असून उन्हाळ्यात संभाव्य पाणी टंचाई चा त्रास तालुक्यातील नागरिकांना होवू नये यासाठी संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये गावात पिण्यासाठी व वापरासाठी पाण्याची काय स्थितीचा आढावा घेण्यात आला.तालुक्यात मांडवा वगळता एकही गाव टँन्कर ग्रस्त नाही.संपूर्ण तालुक्यात नैसर्गिक पाणीटंचाई नसली तरी मात्र जल जीवन अंतर्गत झालेल्या निकृष्ठ कामाने नागरिकांना पाणी टंचाई सामना करावा लागत असल्याची ओरड ऐकू आली.

जल जीवनअंतर्गत अनेक गावात चालले कामे संत गतीने चालू आहे.पाईपलाईन कामे निकृष्ठ असून अल्पावधीत लिकिज होणे फुटण्याचे इ.समस्या निर्माण झाली असून या मुळे पाणीपुरवठा नीट होत नसल्याच्या अनेक तक्रारी या वेळी ऐकायला मिळाल्या.दिग्रस ची पाणीपुरवठा योजना चार वर्षापासून रखडल्या ची तक्रार सरपंच निलेश येल्टीवार यांनी केली.नवीन हिरापूर,भिमनाळा,खडकडोह इ. गावातील पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होण्यास जल जिवनचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा सूर ऐकायला मिळाला.

या बैठकीमध्ये झरी -घोन्सा रस्ता दुरुस्ती व दुपदरी करण करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख मोरेश्वर सरोदे यांनी केली.झरी – मांगुर्ला , बोबापूर – चिंच घाट,सालेभटी -मार्की व मार्की रोडवरी उंच पुल तसेच स्मशान भूमी शेडची मार्कीचे उपसरपंच गजानन मिलमिले यांनी केली.आणि गावातील रस्ते,विद्युत,आरोग्य,शिक्षण,समस्या वन प्राण्यांचा त्रास त्यावरिल उपाययोजना,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चा आढावा बोदकुरवार यांनी घेतला.

कामचुकार कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला असून कामचुकार कर्मचाऱ्यांना वटणीवर आणण्याकरिता शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याचे आदेश देणार असल्याचे सांगण्यात आले.ही आढाव बैठक शांततेत पार पडली असून तहसीलदार गिरीश जोशी, गटविकास अधिकारी आधिकारी रविकुमार सांगळे,माजी सभापती राजेश्वर गोंड्रावार,दिनकर पावडे,सतीश नाकले,सुरेश बोलेनवार,सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर