ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

बोटोणी ते सराटी रस्ता मोजतोय अखेरची घटका.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रस्त्यात एक-एक फुटाचे खड्डे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता.

गजानन आसुटकर मारेगांव:-तालुक्यातील बोटोणी ते सराटी या 4 कि.मी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आले नाही.त्या मुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहे.या रस्त्यावर जंगलातील सुमारे 1 कि.मी अंतराचे काम दोन वर्षा आधी करण्यात आले होते पण उर्वरीत 3 कि.मी. चा रस्ता उखडून खड्डे व गिट्टी चे साम्राज्य निर्माण झाले आहे.

The final element is counting the road from Botoni to Sarati.

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्यातील बोटोणी ते सराटी हा 4 किमीचा रस्ता आहे. मागील काही वर्षांपासून या रस्त्याचे काम करण्यात आलेले नसल्याने हा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. घोन्सा तसेच खंडणी मेंढणी परिसरातील जनतेला बोटोनी अथवा करंजी जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. आणि आता हाच रस्ता अखेरची घटका मोजत आहे.

यावर्षी पडलेल्या अतिवृष्टी मुळे या 3 किलो मीटर रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की वाहन दुरच राहीले साधे पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.हा रस्ता गेल्या अनेक वर्षां पासून तयार करण्यात आला नाही.उखळलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी पंचर होत आहे.या मार्गाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाला मोठी कसरत करत वाहन चालवावे लागत आहे.

या मार्गावरील गावकरी नागरिकांना एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला तालुक्याच्या ठिकाणी नेण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.आणि बाहेरगावी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना खड्यामुळे अथक त्रास सहन करावा लागतो आहे.हा रस्ता पूर्णपणे उखडून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे रस्त्यात तयार झाले आहे.

या रस्त्याने पायदळ चालने सुद्धा कठीण बनले आहे. सदर रस्त्यामुळे परीसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याने ये -जा करणाऱ्याला वाटते की रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता. हा रस्ता जिल्हा परीषद अंतर्गत येत असुन रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी परीसरात नागरिकांची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर