ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

स्त्री भ्रूण हत्या,बेटी बचाव बेटी पढाओ व पर्यावरण विषयी.

59 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

#TDF द्वारा रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

ज्ञानेश्वर आवारी झरी,जामणी

झरी,जामणी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत व नोंदणीकृत असलेल्या टीडीआरएफ ला दि. ९ मे रोजी १८ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त १ ते ९ मे या कालावधीत टीडीआरएफ वर्धापन दिन महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने दि.३ मे २०२३ रोजी मुकुटबन कंपनी (शाखा) च्या जवानांकडून TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या मार्गदर्शनात स्त्री भ्रूण हत्या व बेटी बचाव बेटी पढाओ व पर्यावरण संवर्धन विषयी रॅली च्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

सकाळी रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात आदर्श हायस्कूल येथून प्राचार्य एस.एम डोंगरगरे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांनी भ्रमण करीत नागरिकांमध्ये स्त्री भ्रूण हत्या व बेटी बचाव बेटी पढाओ,स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन या संदर्भात वेगवेगळे नारे देऊन जनजागृती केली.

सदर रॅलीमध्ये स्त्री भ्रूण हत्या या विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली.त्यासंबंधित असणारे कायदे त्यामुळे समाजावर त्याचा होणाऱ्या परिणाम सोबतच पर्यावरण वाचवा,जीवन वाचवा या विषयी मार्गदर्शन करून उपस्थित नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.सदर रॅलीचा समारोप ग्रामपंचायत मुकुटबन येथे करण्यात आला.सदर रॅलीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

दि. १ मे ते ९ मे या कालावधीत संपूर्ण राज्यात TDRF वर्धापन दिन महोत्सव विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे.या मध्ये प्राणी व पक्ष्यांसाठी पाणपोई, विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण,आपत्ती व्यवस्थापन विषयी जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सदर रॅलीसाठी टी.डी.आर.एफ. मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद,निकिता राऊत,वैष्णवी मंदावार,समीक्षा महाकुलकर,राजश्री बोधे,हर्षाली मालेकार,निशा मंदुल्वार,राणी बरडे,अनोखी माहुरे,नंदिनी दुर्लावार,वेदिका येरकाळे,गणेश बुरांडे,रोहिणी लेंगुने,श्रुती बोंडे,संघम पारेलवार,प्रेम सातपुते,स्नेहा मडावी,दुर्गा डाखरे,वास्ती कुळमेथे,लीना ठाकरे, तेजस्वी पानघाटे,अनुश्री येठे, नम्रता सोनेकार, काजल वाडके, गणेश सोनटक्के इत्यादी टीडीआरएफ अधिकारी व जवानांनी परिश्रम घेतले. रॅलीसाठी आदर्श हायस्कूल चे रजत आसावार व पाटील उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर