ब्रेकिंग न्यूज
Dahihandi: दहीहंडीच्या जल्लोषात काळाचा घाला! २ गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, ३०० हून अधिक रुग्णालयात; पाहा कु… YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, पाईपवरून घरात गेला पण…, सोलापुरात भयंकर घडलं, आरोपीला कर्नाटकात पकडलं! News 18 Marathi Headlines | 5 Sept | 9 AM | | Vishakha Raut | Dahi Handi 2026 | शेतकऱ्यांनो सरकारी चकरा कमी करा, ‘हे’ कार्ड आताच बनवून घ्या,कागदपत्र फिरवायची गरज भासणार नाही आजी नको म्हणत होती, पण त्यानं मुकबधिर मुलीला घरी नेलं, आधी भयंकर कृत्य, मग… शेवटी सोलापुरात ‘न्याय’ झाला Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi Navi Mumbai: “ड्रायव्हर काकांनी त्रास दिला…” पोट दुखू लागल्यावर ३ वर्षाच्या चिमुकलीने आजीला काय सांगितलं,… तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी मारेगावात रणशिंग! Kolhapur: घरात कुणी नव्हतं, चुलत दिरानं एकटीला गाठलं अन्…, भयंकर कृत्यानं कोल्हापूर हादरलं! बांगलादेशच्या क्रिकेटरने इतिहास घडवला, ट्रिपल सेंच्युरी ठोकली… पण 400 रनचा चान्स स्वत:च सोडला!
SP News Maregaon

दुचाकीचा अपघात, दोघे विद्यार्थी ठार

98 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गणेशपूर -हिवरदरा शिवारातील घटना

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी

मोहदा येथे वास्तव्यास असलेला विद्यार्थी आपल्या मित्राला तेजापुर या गावी सोडण्यास जात असतांना गणेशपुर हिवरदरा शिवारात पल्सर दुचाकीचा भिषण अपघात झाला.रात्रीच्या अंधारात रस्त्याने जात असलेली म्हैस अचानक दुचाकीच्या समोर आली. धडक जबर होती या अपघातात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री  १२ वाजताच्या सुमारास घडली.

गणेश कैलास टेकाम (१८) राहणार मोहदा ता.वणी व रोहित मरसकोल्हे (१९) राहणार तेजापुर असे दुर्दैवी मृतक विद्यार्थ्यांची नांवे आहेत. गणेश हा बारावीची परिक्षा देत होता. पेपर संपल्यानंतर त्यांने मित्राची पल्सर दुचाकी क्रमांक एम एच ४९ ए एक्स २८९५ ही घेतली. गणेशने आईला रात्री वेळाबाईला जातो असे सांगितले त्यानंतर रोहित सोबत मंगळवारी रात्री ११ वाजता गावी जाण्यास निघाला.त्यानंतर मित्राला तेजापुर येथे सोडण्यास जात असतांना गणेशपुर हिवरदरा शिवारात अपघात घडला.


मध्यरात्री दुचाकीने भरधाव जात असतांना त्यांना रस्त्याने जात असलेली म्हैस दिसली नाही. दुचाकी थेट म्हशीवर धडकली यामुळे दुचाकीस्वार विद्यार्थी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळले. गंभीर दुखापत झाली होती, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला तसेच ते रात्र भर तेथेच पडून राहीले. बुधवारी सकाळी मुकूटबन पोलीसांना माहिती मिळाली. मुकूटबनचे ठाणेदार संतोष मनवर व पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर