ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

मारेगावच्या समाज सेवा बाल गणेश मंडळाची जिल्हा स्तरावरील आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत निवड

913 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव:हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक ठरत समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आदर्श देखावा उभारणाऱ्या समाज सेवा बाल गणेश मंडळ, मारेगाव या मंडळाची यंदा जिल्हा स्तरावरील आदर्श गणेश मंडळ स्पर्धा साठी निवड झाली आहे.

समाज सेवा मंडळाच्या गणेश मुर्तीची स्थापना युसुफ शेख अब्दुल यांच्या नेतृत्वाखाली झाली असून मंडळात हिंदू-मुस्लीम महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. गणेशोत्सव काळात मंडळाने विविध समाजहिताचे उपक्रम राबवले. ३ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, मारेगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.

दि.७ सप्टेंबर रोजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. गणेशोत्सव काळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. दारू व नशाविरोधी जनजागृतीही केली गेली.

पर्यावरण पूरक उपक्रमामध्ये  स्थापना व विसर्जनावेळी डी.जे.चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा उपयोग करण्यात आला. या उपक्रमांच्या आधारे मंडळाने स्पर्धेचे सर्व निकष पूर्ण केले असून जिल्हा स्तरावरील निवड निश्चित झाली आहे.

दरम्यान, निवड झालेल्या मंडळांचा बक्षीस वितरण समारंभ उद्या दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, प्रेरणा हॉल, पोलीस मुख्यालय, यवतमाळ येथे होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर