ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पडोली जवळ बोलेरो गाडीचा भीषण अपघात या अपघात चार ठार.

150 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव येथील शेख कुटुंबाचा पडोली येथे अपघात.

एकाच कुटुंबातील चार सदस्य अपघातात ठार झाल्याची माहिती.

सुरेश पाचभाई मारेगांव,

चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली ते घुगुस राज्य महामार्गापासून काही अंतरावर नागाळा जवळ झालेल्या या भीषण अपघातात मारेगाव येथील शेख कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असुन ही दुःखद घटना आज दिनांक 23 जून 2023 रोज शुक्रवारला दुपाच्या सुमारास घडली.या घटनेने गावासह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मारेगाव येथील शानु ऑटोमोबाईल्स व सानिया कोल्ड्रिंक हाऊसचे संचालक युसुफ शेख व रफिक शेख हे दोघे सगे भाऊ सहकुटुंब राजुरा येथील एका विवाह सोहळा आटोपुन आपल्या बोलेरो गाडी क्रमांक MH.29 BC.6321 या गाडीने मारेगाव येथे परत येत असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे.

पडोली ते घुगुस राज्य महामार्गावर नागाळा जवळ त्यांचे गाडीचा स्टेरिंग रॉड तुटल्याने गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरला धडकली.व डिव्हायडर ओलांडुन दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकली.ही धडक इतकी भीषण होती की त्यांचे बोलेरो गाडीचा समोरील भाग पुर्ण चकनाचुर झाला.या अपघात बोलेरो गाडीतील चारही व्यक्ती हे घटनास्थळीच ठार झाले.

शेख युसुफ शेख नबी,शेख रफिक शेख नबी, मुमताज युसुफ शेख,संजीदा रफीक शेख असे अपघातात ठार झालेल्या चारही व्यक्तींची नावे असून या घटनेने शेख कुटुंबावर दुःखाचा कोसळला आहे.मृतक मोठा भाऊ रफीक शेख यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे तर लहान भाऊ युसूफ शेख याच्या पश्चात दोन मुली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पडोली पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर