ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

बोटोनी येथे ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चा आज शुभारंभ

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नागरिकांच्या प्रश्नांना जागेवरच न्याय; प्रशासनाचा लोकाभिमुख उपक्रम

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव : नागरिकांच्या विविध महसुली अडचणींना तात्काळ दिलासा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चा आज, शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी बोटोनी येथे उत्साहात शुभारंभ होत आहे.

तहसील कार्यालय मारेगाव, महसूल मंडळ जळका (बोटोनी) यांच्या पुढाकाराने तसेच महावितरण, आरोग्य, वन, कृषी, पोलीस आणि एसटी महामंडळ आदी विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, बोटोनी येथे सकाळी १० वाजता शिबिरास प्रारंभ होणार असून नागरिकांच्या महसुली समस्यांचे जागेवरच निवारण करण्यावर प्रशासनाचा विशेष भर आहे. या शिबिरामध्ये ७/१२ उताऱ्यांतील दुरुस्त्या, फेरफार प्रकरणे, नवीन नोंदी तसेच विविध प्रमाणपत्रांचे वितरण एकाच छताखाली करण्यात येणार आहे.

विशेषतः शेतजमिनीच्या हक्कांशी संबंधित तक्रारींचे त्वरित निराकरण होणार असल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ‘डिजिटल ७/१२’ संदर्भात जनजागृती केली जाणार असून ई-मोजणी, वारस नोंदणी यांसारख्या सेवांसाठी जागेवरच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी ‘अग्रिस्टॅक’ व ‘पीएम किसान’ योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार असून ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते योजना’ अंतर्गत प्रस्तावित रस्त्यांवर सुनावणीही घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे शिबिर नागरिक व शेतकऱ्यांसाठी ‘वन स्टॉप सोल्युशन’ ठरणार आहे.

या उपक्रमामुळे प्रलंबित प्रकरणांना गती मिळून नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर