ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगांव – करंजी राज्य महामार्गावर कोठोडा येथे भीषण अपघात 3 जन जागीच ठार तर 1 गंभीर जखमी.

149 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वृत्तपत्र पार्सल करणाऱ्या ओमनी कारचा भीषण अपघात.

तालुका प्रतिनिधी:-केळापुर

केळापुर तालुक्यातील कोठोडा येथे आज दिनांक 11 जुलै 2023 रोज मंगळवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास
वणी- मारेगांव कडून करंजीकडे जाणाऱ्या ओमनी कारला समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने भीषण धडक दिली यात कारचा चक्काचूर होऊन तीन जन जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज सकाळी मारेगांव- करंजी राज्य महामार्गावर असलेल्या कोठोडा पुलाजवळ घडली.

असून सदर कार नागपूर वरून मराठी दैनिक वृत्तपत्र पार्सल घेऊन येणारी ओमनी कार क्रमांक MH. 34 K.1954 ही आज सकाळी वणी- मारेगांव कडून वृत्तपत्र पार्सल देत करंजी कडे जात असताना राज्य महामार्गावर असलेल्या कोठोडा गावा जवळील पुला जवळ समोरून येत असलेल्या अज्ञात भरधाव ट्रक ने कारला जबर धडक दिली.

या अपघातात कारचा समोरील भाग चक्काचूर झाला असुन यात चालकासह 2 प्रवासी एकूण 3 जन जागीच ठार झाले तर एक जन गंभीर जखमी झाला असून त्याला करंजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा भीषण अपघात होताच ट्रक सह चालकाने घटना स्थळावरुन पोबरा केला असुन यात कारचालक किशोर बोरकर रा.आनंद चौक वरोरा जिल्हा चंद्रपूर असल्याची माहिती आहे.बाकी मृतक व जखमी चे नाव बातमी लिहे पर्यंत कळू शकले नाही.

हा अपघात इतका भीषण होता की मृतक अजूनही या भीषण धडकेच्या ओमनी कार वाहनात अडकले आहे.या घटनेची माहिती पांढरकवडा पोलीस मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील मृतकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर