ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

स्कायलार्क इंग्लिश मीडियम स्कूल करंजी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पांढरकवडा (प्रतिनिधी):- सागर मुडे

करंजी: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त करंजी येथील स्कायलार्क इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रयतेच्या राजाला अभिवादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धांमधून मोठा उत्साह दाखवला.


कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीनल घोटेकर यांनी आपल्या प्रस्ताविकातून उपस्थितांना संबोधित केले. “शाळेत वर्षभर थोर महापुरुषांची जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो.

त्यांच्यातील वक्तृत्व चातुर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे कार्यक्रम अत्यंत आवश्यक आहेत,” असे विचार त्यांनी मांडले.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर अतिशय प्रभावी आणि ओघवती भाषणे सादर केली. विशेषतः विद्यार्थिनींनी साकारलेली ‘राजमाता जिजाऊ’ यांची वेशभूषा सर्वांचे आकर्षण ठरली.

तसेच विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पोवाड्यांवर आणि शौर्यगीतांवर बहारदार नृत्य सादर करून वातावरण शिवमय केले.
या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रणिता मोघे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार साक्षी होलगीलवार यांनी मानले. या सोहळ्याला शाळेतील शिक्षक, कर्मचारी, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर