ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

कुंभा येथील शेतकऱ्यांच्या मुलाची नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशीप चेन्नई करिता निवड.

104 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वृषभ विनोद ढाकणे रा.कुंभा याची निवड.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील वृषभ विनोद ढाकणे याची नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशीप चेन्नई करिता निवड करण्यात आली आहे.

या टूर्नामेंट मध्ये आंतर राष्ट्रीय दर्जाच्या मलेशिया व यु ए इ या देशातल्या टीम तसेच भारतातील कर्नाटका, हैद्राबाद,पुणे ,चेन्नई महाराष्ट्र,तामिळनाडू,तेलंगणा विदर्भ,बंगलुर येथील टीम सहभागी होणार आहे.या चॅम्पियनशीप करिता वृषभ ढाकणे याची निवड क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया विदर्भ द्वारे करण्यात आली आहे.

त्याने गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.वृषभ हा 10 व्या वर्गापर्यंत भारत विद्या मंदीर कूंभा येथे शिकत होता.त्याने 11 ते 12 वि पर्यंतचे शिक्षण संकेत विद्यालय मारेगाव येथे पुर्ण केले असुन आता तो मारेगाव येथे आय.टी.आय.करत आहे.तालुक्यातील कुंभा येथील शेतकऱ्यांच्या मुलाची नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशीप चेन्नई करिता निवड झाली.

असून त्याने घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.आई-वडील शेतकरी असून त्यांचे कडे 7 एकर शेती आहे.व त्याचे वडील आटो चालक आहे.घरात कुणीही जास्त प्रमाणात सुशिक्षित नसताना त्याने घेतलेली उंच भरारी कौतुकास्पद आहे.वृषभचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.वृषभ हे श्रेय आई वडीलासह मारेगाव क्रिकेट अकॅडमी,मध्ये कोच गणेश सोनुले यांना देत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर