ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

सराटी येथील जि.प.प्राथमीक शाळेमध्ये हटवांजरी केंद्राची शिक्षण परिषद संपन्न.

109 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील सराटी येथे काल दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोज मंगळवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सराटी येथे हटवांजरी केंद्राची शिक्षण परिषद पार पडली.

असुन त्या शिक्षण परिषदेचे उद्घाटन नंदकिशोर वऱ्हाटे अध्यक्ष शा.व्य.समिती यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र सपाट, श्रीमती टोंगे ताई,आत्रामताई,दरबेशवार सर,राऊत सर,दैने सर, संजय आत्राम सर,लांजेवार सर,वांढरे सर, कु.घुमणार मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली.मनोज लांजेवार सर केंद्रप्रमुख यांनी शिक्षण परिषदेचे महत्त्व व विषय पत्रिकेचे वाचन करून कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर सुरेश आत्राम सर यांनी एकात्मिक पाठ्यपुस्तक,शैलेश बडोले सर यांनी नवोपक्रम लेखन, कु.घुमनार मॅडम यांनी भाषा पेटी बद्दल,दरबेशवार सर यांनी समावेशित शिक्षण याबद्दल सर्व शिक्षकांना माहिती दिली.

राजगडे सर,दैने सर यांनी त्यांच्या शाळेतील इंग्रजी विषयाच्या उपक्रमाची सर्वांना माहिती दिली.तसेच केंद्रातील सर्व शाळांनी इंग्रजी विषयाच्या उपक्रम राबविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.लांजेवार सर केंद्रप्रमुख यांनी इतर प्रशासकीय बाबी बद्दल माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवगडकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दरबेशवार सर यांनी केले.कार्यक्रमाकरिता दोडेवार सर, सर्व शाळा व्यवस्थापन समिती यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाला हटवांजरी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर